अंगलगाव येथे ल॑पीचे 185.लसीकरण
सातोना/पांडुरंग शिंदे
परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे दि.२२.रोजी.
ग्रामपंचायत अंगलगाव मार्फत लंपी लसीकरण शिबीर घेण्यात आले .काही दिवसापासुन महाराष्ट्रसह परतूर तालुक्यात ही ह्या आजाराने शिरकाव केला आहे .मोठ्या प्रमाणावर गाय , बैल इत्यादी जनावरांना होणारा लंपी हा आजार धुमाकूळ घालतोय , लंपी आजारामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाकडून लसीकरण होईपर्यंत या आजारात आपले दुभते जनावर दगवण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि हा आजार अति प्रमाणात पसरू नये यासाठी सरपंच आप्पासाहेब खंदारे यांनी वेळीच लक्ष देऊन गावातील जनावरांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत मार्फत एकूण. 185.. जनावरांचे लसीकरण करून घेतले .हा आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन शिबीर आयोजित केले. होते...
पशुसंवर्धन व
दि:-22/09/2022 रोजी
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ सातोना ता. परतूर जि जालना अंतर्गत मौजे
अगलगाव येथे .किटकनाशकांची फवारणी सह गोचीड व जंत निर्मुलन करण्यात आले, व विषाणूजन्य आजार लंम्पी स्कीन डिसी या आजारा विषयक उपयुक्त उपाययोजना व सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली या प्रसंगी श्जी . यु. वाघ(सहा.पशुधन विकास अधिकारी) वानखेडे (वृणोपचारक) दवंडे (परिचर),
नितीन दवंडे, निलेश दवंडे, आकात, शिंदे राहुल.खाजगी पशु (सेवादाते) पशुपालक-ग्रामस्थ
यावेळी गावातील उपस्थित नागरिक.. कृष्णा खंदारे. अशोक खंदारे. सोसायटी चेअरमन भारतराव खंदारे. पत्रकार.पांडुरंग शिंदे. प्रमोद खंदारे. विश्वनाथ शिंदे.विठल खंदारे
गावातील तरुणांचे व नागरिकांचे सहकार्य लाभले .