माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठाण चा वारकरी सेवा पुरस्काराने , सेवा पुरस्कारामुळे मी धन्य झालो -माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


प्रतिनिधी समाधान खरात 
माझ्या राजकीय जीवनातील गेल्या 40 वर्षांमध्ये मी रंजल्या गांजल्याची सेवा करण्यास प्राधान्य दिले हे करत असताना अनेक संकटाचा सामना मला करावा लागला परंतु श्रीहरी विठ्ठल कृपेमुळे हे सर्व करता आले असे प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते मोरवड ता वडवणी जि बीड येथे जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान मोरवड तालुका वडवणी जिल्हा बीड च्या वतीने स्व जगन्नाथ सिताराम शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ दिला जाणारा वारकरी सेवा पुरस्कार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना प्रधान करण्यात आला यावेळी आपल्या धन्यवाद पर भाषणात बोलत होते
स्व जगन्नाथ सिताराम शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मनानिमित्त कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कीर्तन सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पुरस्काराचे वितरण पंडित उद्धव बापू आपेगावकर, ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे हभप पंडित महाराज क्षीरसागर ह भ प वसंत महाराज यांच्या शुभहस्ते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना प्रदान करण्यात आला
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आपण 1979 पासून लोणी खुर्द तालुका परतुर या माझ्या जन्म गावापासून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली मुळात माझी आई वडील हे वारकरी संप्रदायाशी जोडलेली होते दरवर्षी आषाढी वारीमध्ये नियमितपणे त्यांचे जाणी येणे असे त्याच बरोबर गावात होणारी हरिपाठ भजन कीर्तन या कार्यक्रमाची ते नियमितपणे सक्रिय सहभाग घेत त्यामुळे मुळातच त्यांच्या बोटाला धरून मीही धार्मिक कार्याकडे ओढला गेलो हे करत असतानाच राजकारणाच्या माध्यमातून धर्माची सेवा करता यावी यासाठी मी आपल्या राजकीय जीवनातील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अनेक समाजसेवेचे उपक्रम राबवले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
आपणास वारकरी सेवा हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे आपल्या खांद्यावर आणखीन जबाबदारी वाढली असून यापुढेही मी जबाबदारी पूर्वक धार्मिक सामाजिक कार्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील आपण दिलेल्या पुरस्काराचे ऋण फेडण्यासाठी मी कायम कार्यमग्न राहील असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की,
मी आज जे काही सामाजिक राजकीय धार्मिक कार्य करू शकलो ही केवळ माझ्या आई-वडिलांची पुण्याई असून त्यांच्या पुण्याईच्या जीवावरच आज मी इथपर्यंत पोहोचलो असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले पुढे ते म्हणाले की *कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा* ज्यांचा मुलगा किंवा मुलगी सात्विक आहे समाजसेवी आहे धार्मिक वृत्तीची आहे यातून खऱ्या अर्थाने परमेश्वर प्रसन्न होतो म्हणून ईश्वर कृपेने आपण काम करत गेलो संत महंत गुरुजनांचा आशीर्वाद भेटत गेला परमेश्वरी कृपेने अनेक अडचणीवर मात करत राजकीय जीवनाची चाळीस वर्ष लोणी गावचा सरपंच ते थेट मंत्री पदापर्यंत मला मजल मारता आली ती केवळ जनसामान्यांच्या आशीर्वादामुळे त्यामुळे माझ्या धामण्यात जोपर्यंत रक्त वाहते तोपर्यंत मी समाजसेवेचा वसा सोडणार नाही असे भावउद्गार त्यांनी यावेळी काढले
पुढे बोलताना ते म्हणाले की विपरीत परिस्थितीमध्ये मी राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला हे करत असताना भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाच्या माध्यमातून विद्यमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी देवेंद्रजी फडणवीस च यांच्या मार्गदर्शनाखाली आजही मी धार्मिक सामाजिक राजकीय कार्यामध्ये संपूर्ण ताकतीनिशी काम करत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
मी मंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करताना राज्याचा मंत्री म्हणून राज्याच्या संपूर्ण स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी सांभाळत असताना राज्यातील 18 000 गावांना पाणीपुरवठ्याच्या योजना केल्या हे करत असतानाच स्वच्छतेला महत्त्व देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरामध्ये 70 लाख शौचालय गोरगरीब दलित पीडित बांधवांच्या महिलांसाठी उपलब्ध करून दिली 
स्वच्छतेमध्ये देश पातळीवर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला क्रमांक एक वर नेऊ शकलो असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
धार्मिक कार्य करत असताना देहू जिल्हा पुणे येथे झालेल्या गाथा पारायण सोहळ्यानिमित्त पाच लाख वारकरी देहू नगरीत आले होते अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर अन्नछत्राची जबाबदारी देण्यात आली होती ती यशस्वी पणे पार पाडण्याचं काम माझ्यासह बब्रुवान शेंडगे व आमच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले
सामाजिक कार्य करत असताना छत्रपती राजे संभाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील 1100 चावर सर्व धर्मीय वधू-वरांचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लावून दिले. हे करत असताना अन्नदान गादी पलंग मनी मंगळसूत्र संसार उपयोगी साहित्य देऊन या अकराशे मुलींचे कन्यादान आपल्या हातून झाल्याचे आमदार लोणीकर यांनी यावेळी नमूद केले
आज मला वारकरी सेवा पुरस्कार मिळाल्याचा अतिशय आनंद असून या पुरस्कारामुळे माझ्यावर धार्मिक व सामाजिक कार्याची अधिक जबाबदारी वाढली असून ती मी संपूर्ण शक्तीनिशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थिताना दिले
यावेळी कार्यक्रमाला
 प्रकाश जगन्नाथ शेंडगे, भारत जगन्नाथ शेंडगे संदिपान जगन्नाथ शेंडगे बब्रुवान जगन्नाथ शेंडगे
ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, हभप लक्ष्मण महाराज मेंगडे, उध्वव बापु आपेगावकर, हभप पंडित महाराज शिरसागर , हभप राम महाराज काजळे, हभप वसंत महाराज, हभप बाळासाहेब मोहिते पाटील, प्रा सर्जराव काळे, प्रा महेश निबांळकर, विनोदराव मस्के, ज्ञानेश्वर शेंडगे डाँ सुभाष कदम - परभणी , परतुर तालुकाध्यक्ष रमेशराव भापकर, मंठा तालुकाध्यक्ष सतिषराव निर्वळ , जालना तालुकाध्यक्ष प्रकाश टकले,पंजाबराव बोराडे, नागेशराव घारे, शत्रुग्ण कणसे पाटिल, माऊली शेजुळ,नागेश घारे, जिजाबाई जाधव, तूकाराम सोळंके, संपत टकले, आशोक बेरगुडे, रवि सोळके, रंगनाथ येवले, रामप्रसाद थोरात व पंचकृषीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.