जालन्यातील १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपये निधीच्या कामात मोठा अपहार झाला असल्याची तक्रार वीकास बागडी यांनी केली

 
जालना प्रतिनीधी समाधान खरात
       जालन्यातील १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपये निधीच्या कामात अपहार मोठा अपहार झाल्याची पत्रकार तथा जालना समाचारचे संपादक  विकासकुमार बागडी यांनी राज्यपालासह सर्व संबंधिकांकडे एका निवेदनाव्दारे तक्रार केली असून सदर निवेदनाच्या शेवटी जीवीतास धोका असल्याचेही  नमूद केले आहे.
 या संदर्भातील निवेदनात बागडी यांनी म्हटले आहे की, जालना शहराच्या जल वितरण करीता शासनाने १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांचा निधी खर्च करुन नगर परिषद हद्दीत जन सामान्य जनतेसाठी ४१९ किलो मीटर लांबीची पाईप लाईन आणि ९ जल कुंभ आदी जल वितरण करीता कामाचा करारनामा  मुख्याधिकारी नगर परिषद, जालना यांनी आर. ए. घुले कंत्राटदार पालघर जि. ठाणे यांनी सन २०१६ (दि. २३ जून २०१६) मध्ये केला होता.         सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषद जालना यांनी मे. फोरट्रेस इन्फ्रास्टक्चर ऍडव्हायचरी कन्सलंटस् मुंबई यांची योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन समिती म्हणून नियुक्ती केली आहे. या योजनेची सर्व कामे आराखड्यानुसार पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी या संस्थेची आहे. परंतू सदर संस्थाने आपली कोणतीही जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले नाही. त्यामुळे आर. ए. घुले यांनी करार पत्र आणि अंदाजपत्रकानुसार काम न करता थातूर- मातूर पध्दतीने काम केलेले आहे. कामात मोठी अनियमिता दिसून येत आहे.१३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांच्या निधीमध्ये मोठा अपहार केला आहे. सदर कामाची पाहणी आणि अंदाजपत्रक अनुसार काम करुन न घेता फोरट्रेस इन्फ्रास्टक्चर कंपनीने आर. ए. घुले कंत्राटदाराला बोगस मोजमाप लिहून दिले आहे. नगर परिषद प्रशासनाचे नगर अभियंता, लेखापाल किंवा मुख्याधिकारी यांनी सदर कामाविषयी एकही आक्षेप न घेता आर. ए. घुले कंत्राटदाराला बिल आणि रक्कम मंजूर करुन दिली आहे.१३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांचा निधी खर्च करुन सुध्दा जालना शहरातील जनतेला कोणताही फायदा झाला नाही. संबंधित कंत्राटदार कंपनी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी योजनेमार्फत फक्त अपहार केल्याचे दिसून येत आहे
        तरी साहेबांना माझी लेखी विनंती की, वरील संबंधित कामाविषयी चौकशी करुन योग्य तो गुन्हा दाखल करावा, करिता मी माझे प्रथम अर्ज  आपल्याकडे सादर करत आहे. सदर प्रकरणामध्ये पाठपुरावा व न्यायाकरीता मी  शासनासमोर हजर राहण्यास तयार आहे
                   अशी  विनंती वीकास बागडी यांनी केली आहे या प्रकरणात माझ्या जीवीतास सुध्दा धोका असल्याचे निवेदनात सांगितले आहे
            

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी