सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भारतीय स्टेट बँकेच्या त्रिवार्षिक निवडणुकीत प्रबंधक अतुल सावजी बिनविरोध

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन औरंगाबाद, जालना, परभणी, व अहमदनगर अश्या जिल्हात असलेल्या औरंगाबाद विभागात विभागीय अध्यक्ष म्हणून पुढील तीन वर्षाकरिता बिनविरोध निवड झाली आहे.
संघटनेच्या माध्यमातून अधिकारी वर्गांसाठी त्यांच्या समस्यांसाठी निस्वार्थपणे काम करण्याची जिद्द व तळमळ मनात ठेवून अतुल सावजी यांनी या पदासाठी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला होता. चारी जिल्ह्यामधून त्यांची उमेदवारी बिनविरोध अशी ठरली. एकंदरीत निवडणूक असली म्हणजे हेवे दावे तसेच प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क असतो परंतु भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना ही या गोष्टीला अपवाद ठरली आहे. बँकेच्या औरंगाबाद विभागामध्ये पूर्ण कार्यकारणी बिनविरोध निवडून आली आहे.
यावेळी बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावजी यावेळी बोलताना अधिकारी वर्गांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात येणाऱ्या  अधिकारी वर्गाच्या अडीअडचणी तसेच बँकिंग जीवनातील नवी दिशा देण्यासाठी या पदाचा उपयोग करून करणार असल्याचे ते म्हणाले. जीवनाच्या तरुण वयापासून समाजसेवेची विशेष आवड असलेले तसेच बँकिंग क्षेत्रात विविध पदावर काम करत असताना सेवाभाव ठेवून कार्यरत असलेलं अतुल सावजी हे एक धडपडीचा व्यक्तिमत्व आहे.
 
,
भारतीय स्टेट बँक परतुर शाखेमध्ये मागील तीन महिन्यापासून अनेक बदल केले. आहे. कार्याची चुणूक दाखवली आहे. येणाऱ्या काळात अशाच प्रकारे बँकेची सेवा सुधारणा तसेच अधिकारी वर्गाच्या समस्या सोडवण्याचा मानस आहे. अतुल सावजी, मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बँक परतुर  
फोटो ओळी.. अतुल सावजी, मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बँक परतुर

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत