येनोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी उद्धवराव जोगदंड यांची बिनविरोध निवड...


परतूर प्रतिनिधी: हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील येनोरा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सोसायटीच्या चेअरमन पदी उद्धवराव साहेबराव जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सेवा सहकारी सोसायटीवर 13 पैकी 13 जागेवर पॅनलने विजय मिळवला.
       यामध्ये विजयी उमेदवार कपिल बाबासाहेब आकात ,उद्धव साहेबराव जोगदंड, गीताराम रामचंद्र भुंबर, अर्जुन दगडोबा नवल, नारायण तुळशीराम भुंबर, लिंबाजी सुंदरराव नवल, तुकाराम नामदेव सोळंके ,प्रल्हाद रामभाऊ नवल, सुरेखा नितीन जोगदंड , मीराबाई रावसाहेब नवल, श्रीमंत भीमराव भालके, अशोक शंकर शेळके, नामदेव निवृत्ती बोंबले, हे उमेदवार विजयी होऊन सर्वांच्या एक मताने सोसायटी च्या चेअरमनपदी उद्धव साहेबराव जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल कैलास साळवे ,सुभाषराव जोगदंड, रुस्तमराव बोंबले, विष्णू गायकवाड (सरपंच) सुरेश भुंबर (उपसरपंच)अर्जुन दौंडे ,अंकुश भुंबर,नितीन जोगदंड ,आबासाहेब भुंबर, पांडुरंग नवल , भागवत भुंबर, नामदेव तौर, भीमराव साळवे, प्रकाश बोंबले, ज्ञानेश्वर साळवे
गावकऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड