सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पत्रकार अजय देसाई यांना बी.रघुनाथ साहित्य पुरस्कार जाहीर




परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
       येथील पत्रकार, कवी, लेखक , साहित्यकार अजय देसाई यांना पत्रकार अजय देसाई यांना बी.रघुनाथ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने वाङ्मयीन उपक्रमांतर्गत बी.रघुनाथ स्मृती दिनानिमित्त सदरील पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती पतंजली आयुर्वेद क्लिनिकचे डॉ दीपक दिरंगे यांनी ही माहिती दिली.
 यात कथा,कादंबरी,कविता,वैचारिक लेखन, ललित साहित्य आदी साहित्य प्रकाराचे लेखन करणा-या मंठा-परतूर तालुक्यातील लेखकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 
      पुढील सन्मानीय साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले यापूर्वी छबुराव भांडवलकर (कादंबरी, कथा),डाॅ.प्रा.अशोक पाठक (कविता),डाॅ.प्रा सदाशिव कमळकर(वैचारिकलेखन),
डाॅ.धोंडोपंत मानवतकर(ललितलेखन)
या मान्यवरांचे नाव घोषित करण्यात आले होते. परतूर शहर विभागातून अजय देसाई यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली . देसाई यांनी निसटते क्षण चारोळी संग्रह, ओला अंधार कादंबरी, आत्मसमर्पण नाट्य कथा, वडाचे झाड कविता साहित्य, ललित, लेख अशा अनेक लेखनातून परतूर तालुक्यातील साहित्य चळवळ तेवत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला, या दृष्टीने त्यांना सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ दीपक दिरंगे यांनी दिली. या सर्व साहित्यिकांना लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिकाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफल असे असणार आहे. या पुरस्काराबद्दल माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, मा आ सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष कपिल अकात, जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ भगवान दिरंगे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे यांच्यासह साहित्य प्रेमींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत