मंठा येथे गौरी पुजा मोठ्या आनंदात साजरी.


मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील नाईक नगर येथे महालक्ष्मी पुजा मोठ्या आनंदात साजरी केली जाते. 
गणपती बरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळाच महत्त्व असत,गौरीची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते.
      महाराष्ट्रात या सणाला लक्ष्मी पूजन असेही म्हणतात. गणपतीच्या बरोबरच गौरीचा सण ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो.गौरी एका दिवशी येतात दुसऱ्या दिवशी मिष्ठान्नाचे जेवण जेवतात व तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात.प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गोरी बसविल्या जातात."गौरी आली सोन्याच्या पावली- गौरी आली चांदीच्या पावली" असे म्हणत पहिल्या दिवशी घरातील तुळशी पासून पावला पावलांनी डोक्यावरून या गौरीला घरात आणली जाते.तर गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरीचे माहेर वाशीनी सारखे स्वागत केले जाते.त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजविण्यात येते.म्हणून हा सण तीन दिवस साजरा करतात.या माहेरवाशिनी आहेत असे म्हणून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते.गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीची प्रतीक आहेत असे मानले जाते.या दिवशी सर्व माहेरवाशिनी एकत्र येऊन गौरीची पुजा अर्चा करतात. या मागची पौराणिक कथा अशी की,फार पूर्वी दानवाचे राज्य होते. दानव देवांना फर त्रास देत असत,सर्व देवांच्या स्त्रियांना यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली.म्हणून सर्व देवाच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली.महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले.याप्रसंगी आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो.गौरी मूळ नक्षत्रावर विराजमान होतात,सौभाग्य आखंड रहावे हा या मागचा हेतू असतो. गौरी मुळ नक्षत्रावर बसतात ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे.हे पंचगात पाहून गौरी आणल्या जातात.काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात