मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे ५० लक्ष रुपये किमतीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामाचे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन ,लंम्पी प्रादुर्भाव व उपाय योजना लसीकरण मेळावा पांगरी येथे संपन्न=लंम्पीमुळे दुधाळ जनावर दगावल्यास ३०००० तर बैल दगावल्यास २५००० व वासरू दगवल्यास १६००० रु शेतकऱ्यांना देणार - लोणीकर
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
मी शेतकरी असल्यामुळे लावणीला असलेले बैल गाय वासरू दगावल्याचे दुःख मला चांगले माहीत असून शेतकऱ्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या जनावरांवर लम्पि नावाच्या साथीच्या रोगाने, शेतकऱ्यांना संकटात टाकले असून या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी व जनावरे वाचवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार संपूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे ५० लक्ष रु किमतीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन व लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भातील मेळाव्यात बोलत होते यावेळी मंचावर हभप विठ्ठलगिरी महाराज गोखुरेश्वर संस्थान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊसाहेब पाटील कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामराव भाऊ लावणीकर उत्तमराव राठोड, बाबूलाल डी.पवार उपसभापती नागेश घारे, भाजपा जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले सरपंच परमेश्वर मानकर, उपसरपंच संतोष पवार डॉ.आशिष राठोड महादेव बाहेकर, कल्याण उबाळे बाबाजी आटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरणानुसार दुधाळ जनावरांचा लम्पि आजाराने मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपये वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपये याप्रमाणे राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारा असून मात्र ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून आपण यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टीची सविस्तर कल्पना देत उपायोजना व मोफत लसी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असल्यामुळे प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांमध्ये लसीकरणाला अडचणी येणार नाहीत. असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले
शेतकऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुधाळ गाई बैल वासरू आदी गोठ्यात असणाऱ्या जनावरांची व्यवस्था घेतली पाहिजे हे करत असताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आपल्या जनावरांचा सांभाळ केल्यास वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यात आपण यशस्वी होऊ असेही यावेळी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या लोणी खुर्द गावी माझ्याकडे शंभरच्या वर जर्सी गाय होत्या या जर्सी गाईंची काळजी घेण्यासाठी नियमितपणे मी लोणी येथे जात असे विविध प्रकारच्या आजारावरील लसीकरण करताना कधी कधी डॉक्टर उपलब्ध होत नव्हते अशा वेळेस आपण स्वतः गोठ्यातील गाईंना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी उपायोजना केलेल्या होत्या अशी यावेळी त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी आपल्या जनावराची काळजी घेतल्यास या रोगाला आळा घालण्यात आपण यशस्वी होऊ अशी यावेळी बोलताना ते म्हणाले. आज पांगरी गो ता मंठा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होत असून निश्चितपणाने या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या विविध आजारावर या दवाखान्याच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. गोठ्यातील जनावरांना शेतकरी आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळत असतो हा सांभाळ करत असताना लंपी आजारासारखी रोगराई आल्यामुळे शेतकऱ्याला चिंतेने ग्रासलेले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतीत कुठलीही चिंता करण्याची गरज नसल्याचे यावेळी बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुधीर जोशी, कार्यकारी अभियंता कांडलीकर उपअभियंता निवारे माजी रोहयो समिती अध्यक्ष दिलीप चव्हाण महादेव बाहेकर महेश पवार कल्याणराव कदम श्रीराम राठोड डॉ शरद पालवे पुरुषोत्तम चव्हाण शिवाजीराव चव्हाण परमेश्वर चव्हाण लक्ष्मणराव उफाड बालासाहेब तोटे अशोकराव चव्हाण दयाराम पवार रावसाहेब राठोड अरुण आखाडे शिवाजी मानकर रोहिदास पवार राजू जाधव भानुदास चव्हाण संतोष रायमुले संजय चव्हाण अमोल खंडारे सुभाष भाग्यवान बंडू नाना खंडागळे संदीप खरात बाळासाहेब खंडागळे लतिष शिंदे दिगंबर उबाळे रामेश्वर चव्हाण बाळासाहेब चव्हाण कल्याण चव्हाण बाळासाहेब सावंत महेश चव्हाण स्वप्निल चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती