रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन मंठा येथे शिक्षकांचे सत्कार करून शिक्षकदिन उत्साहात संपन्न


मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
     मंठा शहरातील रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ०५सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून शहरातील शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक जी.डी.जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.पांडुरंग वगदे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विलास पवार यांनी केले.तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व रेणुका माता प्रतिमा भेट देऊन शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक राधाकृष्ण विधाते सर यांनी मनोगत व्यक्त केले. समाजामध्ये शिक्षकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे आवर्जून सांगण्यात आले.तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी रेणुका माता अर्बन शाखेतील कर्मचारी श्री.रंजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, हे उपस्थित होते. तर श्री.एस.यु.वायाळ यांनी रेणुकामाता अर्बन बँकेने शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड