दरेगाव येथील ग्रामस्थ यांचा लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

जालना प्रतीनीधी समाधान खरात
घरासमोर असलेल्या घाणीचे साम्राज्य आणि नाली साठी सिंदखेडराजा पंचायत समिती समोर दरेगाव येथील नारायण काळे यांनी केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी ग्रामसेवक यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या हेतू पुरस्कर दुर्लक्षामुळे नारायण काळे यांचे कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले होते.
        घरासमोर ग्रामपंचायत ने नाली बनवली नाही त्यामुळे दुर्गंधी पसरली तर तुंबलेल्या घाण पाण्यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आल्याने नाली बांधकाम करून घाण पाण्याची निकासी करून देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी त्यांनी उपोषण सुरू केले होते झोपी गेलेल्या ग्रामपंचायत मध्ये हालचाली सुरू झाली. रविवारी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक लिंबाजी इंगळे यांनी नारायण काळे यांना उपोषण मंडपाला भेट दिली व लेखी आश्वासन दिले त्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले तसेच 
     या उपोषणाला मनसे शाखाउपाध्यक्ष बालाजी चाटे यांनी पक्षाचा पाठिंबा दिला आणि वेळोवेळी पाठपुरावा केला सोबत  सर्जेराव काळुसे, गणेश बंगाळे, संतोष काळे, प्रवीण साबळे ,  प्रताप काळे, विशाल बंगाळे , गावकरी उपस्थित आणि यासाठी शाखाध्यक्ष राधेश्याम बंगाळे पाटील यांनी  जर   सफाई झाली नाही तर कडक अंदोलनाचा इशारादिला होता 

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....