मनसेचे सचिन पाटील यांचा खुन करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करा- सिद्धश्वर काकडे

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
परभणी मनसे शहर अध्यक्ष  सचिन पाटील यांचा त्यांच्या कार्यालयात एका गुंड वृत्तीच्या आरोपीकडून खून करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे. सामाजिक आयुष्य जगणाऱ्या लोकांवर आसे भ्याड हल्ले योग्य नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केली आहे. 
     या संदर्भात त्यांनी आपल्या कार्यालयाच्या वतीने परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या कार्यालयास तक्रार सादर केली आहे. परभणी मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्या आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अासे योग्य चार्जशीट तयार करावे. व कठोर शिक्षा करावी जेणेकरून सामाजिक काम करणाऱ्यावर असे हल्ले होणार नाही. या मागणीचे पत्र मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना सादर केले आहे. पोलीस आणि राजकीय कार्यकर्ता हा जनते मधील एक प्रकारचा दुवा आहे. म्हणुन परभणी पोलीस प्रशासनाने ताबडतोब दखल घेत सचिन पाटील यांचा खून करणाऱ्या व्यक्तीला अटक करून कठोर शिक्षा करावी आशी मागणी मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले