राजस्थानी नवरात्र महोत्सव कार्यकारिणी अध्यक्ष शरद भारुका उपाध्यक्ष शुभम ओझा तर सचिव रोहीत पोरवाल
परतूर : प्रतिनिधी हनुमंत दवंडे
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने नवा मोंढा भागात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवात यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येणार आहे
महोत्सवाच्या कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली अध्यक्ष : शरद भारूका, उपाध्यक्ष:- शुभम ओझा , सचिव:- रोहीत पोरवाल कोशाध्यक्ष:- स्वप्निल भंडारी, सहसचिव:- अभिषेक अग्रवाल , कार्याध्यक्ष:- सौरभ बागड़िया , कार्यकारी सदस्य : गोविंदजी मुंदड़ा, अक्षय नहार, वैभव सोमाणी, ललीत मोर, मार्गदर्शक निखिलजी अग्रवाल, राजेन्द्रजी पोरवाल, योगेशजी खंडेलवाल, आनंदजी कोटेचा यांचा समावेश करण्यात आला असून या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले यात गरबा नृत्य, भजनांचा कार्यक्रम, सुशील बजाज यांचा नवरात्र व जम्मा जागरण कार्यक्रम आयोजित केल असल्याचे अध्यक्ष शरद भारूका यांनी माहिती दिली.