आसनगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश,युमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आसनगाव तालुका परतुर येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज दिनांक 05 रोजी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
यांच्या विकासात्मक भूमिकेने प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशित कार्यकर्त्यांनी सांगितले
परतुर येथील स्नेह निवास येथे संपन्न झालेल्या प्रवेश सोहळ्यामध्ये युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी आसनगाव येथील प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजपाचा सेला देऊन सत्कार केला
यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टी हे एक कुटुंब असून भारतीय जनता पार्टी परिवारात आज आपण प्रवेश करत आहात याचा आनंद असून यापुढे गाव विकासासाठी झोकून देऊन काम करण्याचा सल्ला यावेळी राहुल लोणीकर यांनी प्रवेशित सरपंच व कार्यकर्त्यांना दिला
पुढे ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा अजेंडा विकास हाच असून आपण विकासाच्या झेंड्याखाली आज आला असून निश्चितपणाने आपणास सामाजिक सेवेची संधी पक्षाच्या माध्यमातून आपल्या कामाच्या बळावर मिळेल अशी ही यावेळी बोलताना सांगितले
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला असून येणाऱ्या काळातील विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे राहुल लोणीकर यांनी यावेळी सांगितले
यावेळी आसनगाव चे सरपंच अर्जुन शेळके, भाऊसाहेब खरात, उमेश चौके, शिवाजी खरात, तुकाराम शेळके, भास्कर शेळके, विलास झोटे, नकुश शेळके, काशिनाथ शेळके, भीमराव शेळके, दिगंबर शेळके, पांडुरंग चौके, माऊली चौके, भागवत चौके, किरण चौके आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शत्रुघ्न कणसे विष्णू गायकवाड संदीप पाटील बबलू सातपुते बंडू भुंबर आदी उपस्थित होते