महेश (भाऊ) सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत विविध कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न.......

 प्रतीनीधी हनुमंत दंवडे
 सातोना (खु) Aयेथील महेश भाऊ सीतारामजी आकात यांच्या जयंतीनिमित्त दि 8 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी 
विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा सातोना (खुर्द) येथे संपन्न झाला, ज्यामध्ये ग्रामीण आरोग्य केंद्र सातोना (खुर्द) येथे रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी कायमस्वरूपी भोजन सेवांचा उद्घाटन सोहळा चार्टर्ड अकाउंटंट नारायण कुलकर्णी  , यश महेशराव आकात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.  स्व. दत्ता (आबा) आकात यांच्या स्मृती प्रित्यर्थ  जिल्हा परिषदच्या तीनही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरूपी दुरूस्तीकाम, पुनर्व्यवस्थापन  नवीन टाकीचे उद्घाटन संपन्न झाले.
 जी. प.प्राथमिक शाळा सातोना खुर्द येथे धनंजय सराफ यांच्या शुभहस्ते जि.प.प्रशाला सातोना खुर्द येथे अब्दुल रहेमान यांच्या शुभहस्ते तर जि.प.उर्दू प्राथमिक शाळा येथे श्रीमंत आप्पा आकात , आशिष  आकात यांच्या शुभ हस्ते झााले याबरोबरच रक्तदान शिबिराचे  उद्घाटन शंकर खंदारे , डॉ संजय लाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

       कार्यक्रमाचे उदघाटक सी. ए. नारायण कुलकर्णी यांनी महेश भाऊ यांच्या कार्याचा उल्लेख करत सातोन्यासारख्या ठिकाणी सरपंच असताना गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य, पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सुबकता वृद्धिंगत करणे, यश मिल्क उद्योग व यश पोल फॅक्ट्री अशा विविध उद्योगाच्या माध्यमातून सातोना सारख्या ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे यासारखे पवित्र कार्य हाती घेतले होते असे सांगितले.
               यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ एस. बी. नीलवर्ण ,डॉ, सागर , बालासाहेब उ. आकात  जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रंगनाथ मरपडवार, बद्रीनाथ बाबर , विजय वायाळ, नासिरोद्दीन खतीब यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी गावकरी मंडळी,  पंचक्रोशितील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महेश भाऊ सिताराम आकात फाउंडेशनचे अध्यक्ष बालासाहेब सिताराम आकात यांचा तिन्ही शाळेच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान महेश भाऊ सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ऐकून 109 रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश ग्रुप चे सर्व कर्मचारी व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.

ग्रामीण रुग्णालय सातोना खुर्द हे जवळपास दहा-बारा गावांचे मोठे ओपीडी केंद्र आहे येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. ऍडमिट रुग्ण व नातेवाईक यांची अनेक वेळा जेवणापायी तारांबळ होते त्या सर्व अडचणी लक्षात घेऊन महेश भाऊ सितारामजी आकात फाउंडेशन तर्फे रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी *जेवणाची कायमस्वरूपी विनामूल्य सेवा* सुरू करण्यात आली याचा रुग्ण व नातेवाईकांना मदत होणार आहे. यासाठी महेश भाऊ सितारामजी आकात फाउंडेशनचे मनापासून आभार.

   डॉ.एस. बी. नीलवर्ण  वैद्यकीय अधिकारी
           ग्रामीण रुग्णालय सातोना

    
             

   
             
           यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यू तसेच यश अर्बन को-ऑ. क्रे.सोसायटी लि. परतुर यांच्या वतीने दरवर्षी नित्य नियमितपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त व रक्त घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. यावर्षी ही महेश भाऊ सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत रक्तदान शिबिरात 109 नागरिकांनी रक्तदान केले आहे.

       श्री प्रकाश भांगे
 स्वामी समर्थ ब्लड बॅक,  जालना

        
          
      आजपर्यंत आयोजित केलेल्या सर्व सामाजिक कार्यात नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. यामुळे अनेकांना मदत मिळत असल्याने समाधान वाटते. स्व.महेश भाऊ आकात यांनी लोकहितासाठी सुरु केलेले कार्य महेश भाऊ सीतारामजी आकात फाउंडेशन च्या माध्यमातून अखंडितपणे पुढे सुरु ठेवणार. 
        बालासाहेब सितारामजी आकात
अध्यक्ष : महेश भाऊ सितारामजी आकात फाउंडेशन

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड