केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवून "सेवा समर्पण पंधरवडा" साजरा करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन,माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - माजीमंत्री आमदार लोणीकर यांच्या आरोग्य विभागाला सूचना ,"महिला सुरक्षेसाठी डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा - लोणीकर यांचे आवाहन




मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवडा" साजरा केला जात असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवून "सेवा समर्पण पंधरवडा" साजरा करावा, *केंद्र सरकारकडून पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत पहिलं बाळंतपण असणाऱ्या गरोदर महिलेला ५००० रुपये लाभ दिला जातो तर महाराष्ट्र सरकारकडून मानव विकास मिशन अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती-जमाती च्या बुडीत मजुरी असणाऱ्या महिलेला ४००० रुपयांचा लाभ दिला जातो,*  असे गोरगरीब, दीन दलित शेतकरी शेतमजूर यांच्यासह पुरुष महिला युवा युवती यांच्यासह सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं.
यावेळी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा ग्रामीण रुग्णालय येथे सी.एस.आर. फंडातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली, यावेळी भाजप जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ, जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे उपसभापती नागेशराव घारे, उपसभापती राजेश मोरे, विठ्ठलराव काळे, प्रसादराव बोराडे, मुस्तफा पठाण, शेषनारायण दवणे, प्रसादराव गडदे, सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख,डॉ.योगेश राठोड, डॉ.प्रताप चाटसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला आरोग्याला प्राधान्य देणार हे सर्व सामान्य जनतेचा सरकार असून यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये महिला आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यानिमित्ताने राज्यातील १८ वर्षांवरील युवती, गरोदर महिला, मातांची तपासणी करण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशी संकल्पना घेवून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.या सर्व युवती, गरोदर महिला आणि मातांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होणार असून दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या ठरवून दिलेल्या वेळेत ही शिबिरे होतील. २६ आक्टोंबरपर्यंत ही मोहिम राबवण्यात येणार असून या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा अशा सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज आरोग्य विभागाला दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. वैद्यकीय अधिकारी स्वत तपासणी करतील. आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात येईल.उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी करावयाची असून या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात यावीत असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

भरारी पथकाच्या माध्यमातून १८ वर्षांवरील युवती व महिलांची आरोग्य तपासणी केली जाईल. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकानेही शाळांमध्ये आरोग्य तपासणी करावयाची आहे. या दरम्यान नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही  या दरम्यान माहिती देण्यात यावी. १८ वर्षावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी, विविध समस्यांबाबत समुपदेशन करण्यात यावे, खेड्यापाड्यातील असुशिक्षित तर शहरातील सुशिक्षित मातांकडून अनपेक्षितपणे दररोजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बऱ्याच चुका होत असल्याने घरातील प्रमुख व्यक्ती आजारी पडते. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे घरातील प्रमुख जबाबदारी सांभाळणारी माता हिचे आरोग्य चांगले राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये हे अभियान जिल्ह्याभरात राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले.

या अभियान कालावधीमध्ये जिल्हा आरोग्य विभागाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच विविध आरोग्य विषयक समस्यांसाठी तज्ञ डॉक्टरांसह विविध तज्ञ व्यक्तींकडून समुपदेशन केले जाणार आहे. या मोहिमेत १८ वर्षावरील सर्व स्त्रियांची, मातांची आरोग्य विषयक तपासणी, गरोदर महिला, बालकांची आरोग्य तपासणी, रक्त चाचण्या, लसीकरण, गर्भधारणा पूर्व काळजी, जननक्षम जोडपी यांना कुटुंब कल्याण कार्यक्रमाबाबत माहिती, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना पाळणा लांबवणे, मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. महिलांच्या गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सर तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अति जोखमीच्या माता, बालके यांना संदर्भ सेवा देऊन तज्ञामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. विविध महाविद्यालयांमध्ये मुलींचे समुपदेशन केले जाणार असून निरोगी आयुष्याबाबत जनजागृतीही केली जाणार असून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण कायम तत्पर असल्याची ग्वाही यावेळी लोणीकर यांनी उपस्थितांना दिली.

अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून आजारी विद्यार्थ्यांवर उपचार केले जाणार आहेत. सर्व आरोग्य संस्था स्तरावार कोविड लसीकरण विशेष सत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष प्रजनन व बाल आरोग्य शिबीर, मानविकास शिबीर, डिजीटल हेल्थ मिशन (आभा कार्ड) वितरण, असांसर्गिक आजार सर्वेक्षण निदान व उपचार शिबीर, महाविद्यालय किशोरवयीन मुलींचे प्रबोधन व आरोग्य शिबीर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि खाजगी यु.एस.जी. केंद्रावर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबवले जाणार असून या अभियान कालावधीमध्ये अधिकाधिक गरोदर मातांची अधिकृत सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी व अधिकाधिक महिलांना मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही आवाहन देखील लोणीकर यांनी यावेळी उपस्थित डॉक्टर्स लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी डॉ.जीवन मुरक्या, प्रकाश मुळे, राजेभाऊ बोराडे, अशोक बोराडे, नवनाथ चट्टे, शिवाजीराव थोरवे, लक्ष्मण बोराडे, बंडूनाना खरात, भगवान लहाने, अमोल झोल, जगन काकडे, आनंद वाघमारे, रामा दहातोंडे, सचिन वाघमारे, शिरू खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड