30 ऑक्टोबर रोजी जालन्यात भाजपा युवा मोर्चा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार
प्रतिनिधी समाधान खरात
भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी युवा नेते राहुल लोणीकर यांची निवड झाल्याबद्दल दिनांक ३० ऑक्टोबर रविवार रोजी वृंदावन गार्डन, हॉटेल गॅलेक्सी जालना भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार कैलास गोरंट्याल माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार संतोष दानवे आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड माजी आमदार अरविंद चव्हाण माजी आमदार विलासराव खरात माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोष सांबरे रिपाईचे नेते ब्रह्मानंद चव्हाण उद्योगपती घनश्याम शेठ गोयल शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर सतीश टोपे भास्करराव दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४:०० वाजता हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
जिल्हाभरातील युवकांसाठी प्रेरणास्थान असणारे राहुल लोणीकर यांची निवडणे महाराष्ट्रातील युवांसाठी काम करणाऱ्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी झाल्यानंतर जिल्हाभरात फटाके कडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला होता मागील काळात ४२ पेक्षा अधिक मोठी व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथील अशी आंदोलने करून विसरला युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडले होते त्या कामाचे दखल घेत युवा मोर्चाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची भाजपा प्रदेश महामंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा श्री राहुल लोणीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
युवकांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर प्रदेशाध्यक्ष होणारे राहुल लोणीकर पहिले युवानेते ठरले आहेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षात मोठी संधी मिळत असते ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व आपापल्या पक्षात युवा कार्यकर्त्याची मोठी कळी निर्माण व्हावी त्यांच्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले असल्यास संयोजकांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज चौक मोतीबाग येथून मोटरसायकल रॅलीला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मामा चौक बस स्थानक मार्गे हॉटेल गॅलेक्सी येथे रॅलीचा समारोप होणार आहे सर्व पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व नगरपरिषदाचे व नगरपंचायतीचे नगरसेवक सरपंच चेअरमन कार्यकर्ते यांनी सत्कार समारंभ उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.सुजित जोगस संदीप हिवराळे गोविंद ढेंबरे शिवराज नारीयवाले, गजानन उफाड विकास पालवे, सचिन गाढे, रमेश गायकवाड, राम राठोड, विक्रम ऊफाड, करण निकाळजे, सचिन नारियलवाले, विनोद दळवी, राहूल पळसपगार, अर्जुन गोरक्षक,जितु मुटकुळे, गणेश देशमुख, रवी दांडगे यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.