मंठा येथे सोमावारी कविसंमेलन


  मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
     दि.०९ मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उद्या १० ऑक्टो. रोजी, सायंकाळी ठीक ६:३० वा मंठा येथे "पौर्णिमा कवितेची" या शीर्षकांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
     जि. प.प्रशालेच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ.राजेशभैया राठोड यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ए.जे.बोराडे पाटील यांची उपस्थिती असेल, तर विशेष अतिथी म्हणून भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र सचिव मा.राजेश मोरे व अ.भा.सा. सोशल फाऊंडेशनचे संचालक मा.डॉ.प्रवीण माळेगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
     या कविसंमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,अकोला, निलेश चव्हाण औरंगाबाद, अविनाश भारती परळी, धम्मपाल जाधव,औरंगाबाद यांच्या बहारदार काव्याची मेजवानी उपस्थित रसिकांना मिळणार आहे.
    याच कार्यक्रमात मंडळाचे वयोवृद्ध सक्रिय सभासद प्राचार्य कु.पि.इंगळे व श्री हरिराम तिवारी ( बाबुजी ) यांचा "जीवनगौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कविसंमेलनास मंठा,सेलू, परतूर, वाटूर व मंठा शहरासह तालुक्यातील काव्यरसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आविष्कार साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.धोंडोपंत मानवतकर, डॉ.संतोष मोरे, प्रा.डॉ, सदाशिव कमळकर, श्री पी.टी. प्रधान, सौ.शोभा डहाळे, प्रा.प्रदीप देशमुख, शिवाजी जाधव, ओमप्रकाश राठोड, सौ.मंजूषा काळे,प्रदीप इक्कर, विजय गायकवाड व शत्रुघ्न तळेकर आदींनी केले आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले