मंगळवारी परतूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार, हाजारोच्या संख्येने उपस्थित रहा -बाबासाहेब गाडगे

परतूर प्रतिनिधी  हनुमंत दंवडे
      झोपलेल्या सरकारला व प्रशासनाला शेतकयांच्या प्रश्नावर जागे करण्यासाठी परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस,तुर,सोयाबिन सह आदि पिकांची झालेल्या नुकसानीची हेक्टरी 50000 रुपये भरपाई देण्यात यावी व फळबाग नुकसानीसाठी हेक्टरी 100000 मदत देण्यात यावी व तसेच तात्काळ 100% पिक विमा मंजूर करण्यात यावा व तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करून दिवाळी गोड करावी या मागणीसाठी मा.आ सुरेशकुमार जेथलिया,अन्वर देशमुख  यांच्या उपस्तिथीत उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन देण्यांत येणार आसल्याचे एका प्रसिद्ध पत्रकात सांगितले आहे
दिवळी आगोदर मदत जाहीर न झाल्यास  दिवाळी नंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल तरी हे निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी दिनांक 18-10-22 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या संपर्क कार्यालयाजवळ उपस्थित राहावे असे अवाहन  कांग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे व परतूर तालुका काँग्रेस कमिटी ने केले ले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी