भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई सवने महाराज यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने सन्मानित
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
ख्यातनाम कीर्तनकार परतूर तालुक्याचे भूषण सुप्रसिध्द कीर्तनकार भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने पुणे येथे एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची संत परंपरा, कीर्तन परंपरा जपणाऱ्या 'मन मंदिरा-गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून 'उत्सव कीर्तनाचा, गौरव कीर्तनकारांचा' हा पुरस्कार सोहळा झी टॉकीजच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात दैठना खुर्द येथील रहिवाशी परतूर तालुक्याचे भूषण, महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचे मानबिंदू सुप्रसिध्द कीर्तनकार भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रसिध्द गायिका श्रीमती सन्मिता धपाटे व श्रीमती दिप्तीताई भागवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील तमाम वारकरी बांधव, संप्रदायातील मंडळींसाठी ही गौरवाची बाब आहे. झी टॉकीजचा हा 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्कार मिळाल्याबद्दल भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.