शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी मोहन अग्रवाल यांची नियुक्ती
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
परतूर नगररपालिकेचे माजी गटनेते मोहन अग्रवाल यांची शिवसेनेचा हिंदू गर्व गर्जना व शिवसंपर्क अभियान यात्रेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.
यावेळी मोहन अग्रवाल यांनी बोलतांना म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून एकनिष्ठतेने प्रामाणिक काम करून शहराचा विकासासाठी मोठा निधी आणून विकास कामे केली आहेत. शिवसेनेचे माध्यमातून यापुढे मोठी चळवळ उभा करून सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहण्याची ग्वाही यावेळी मोहन अग्रवाल यांनी दिली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर, खासदार हेमंत पाटील, उपनेते विजय नहाटा, अमोल सुरुंग, बाबासाहेब चिखले, सतीश हजारे, दत्ता कातारे, अविनाश कापसे, अविनाश कापसे, दीपक हिवाळे, दत्ता अंभुरे, गजानन वटाने, गजानन आकात, गंगाधर गोरे, नितीन राठोड, सोनू डोलारकर, राजाभाऊ मुळे, विष्णू जगताप, बळीराम वाघमारे, रितेश अग्रवाल, अरुण धुमाळ, प्रल्हाद बोराडे, रामेश्वर खरात, शिवाजी लहाडे, उदयसिंग बोराडे, गजानन बोराडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी मोहन आग्रवाल यांचा सत्कार केला.