मतदार संघातील जनतेच्या प्रेमाने आशीर्वादाने भारावलो कायम जनतेच्या ऋणात राहील - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,येणाऱ्या विधानसभेत २०० पेक्षा अधिक मतदार संघात युवा मोर्चा निर्णायक भूमिका निभावणार - युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा निर्धार,परतूर येथे लोणीकरांच्या उपस्थितीत दिवाळी स्नेह मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
परतुर विधानसभा मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले असून जनतेच्या प्रेमातून मी कदापि उतराई होणार नाही उलट कायम जनतेच्या ऋणात राहील जनतेच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहील अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या परतुर येथे आयोजित दिवाळी स्नेह मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी लोणीकरांसह मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या

राहुल लोणीकर यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी घराणेशाहीची टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राहुल लोणीकर यांची निवड ही पूर्णपणे त्यांच्या कर्तुत्वावर अवलंबून असून राहुल लोणीकर यांच्या कामाची पावती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कर्तुत्ववान व्यक्तीच्या कामाची दखल घेतली जाते तशी इतर पक्षात घेतली जात नाही म्हणून जयंतराव पाटील यांनी भाजपच्या घराणेशाहीची चिंता करू नये त्यापेक्षा स्व पक्षातील अनेक बाबींवर लक्ष दिल्यास बरे होईल असा खोचक टोला देखील लोणीकर यांनी यावेळी लगावला

भारतीय जनता युवा मोर्चा वर आगामी काळात खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युवा मोर्चावर ४० खासदार आणि २०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्यासाठी रणनीती आखणे तसेच आवश्यक त्या सर्व बारकाव्यांनिशी शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करणे सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देणे यासारख्या बाबी करणे क्रमप्राप्त ठरणार असून त्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने प्रत्यक्ष कामावर अधिकाधिक भर देणे आवश्यक असल्याचे देखील लोणीकर यांनी स्पष्ट केले

भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सकारात्मक काम हाती घेणार असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये युवा मोर्चा निर्णायक भूमिका बजावणार असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे बांधणी केली जाणार असल्याचे याप्रसंगी बोलताना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले

युवा मोर्चाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यातील काळात युवा मोर्चा प्रयत्नशील राहणार असून प्रत्येक समाज घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी कायम तत्पर राहणार आहे विरोधाच्या भूमिकेत असताना अनेक मोठमोठे आंदोलने करणारी युवा मोर्चा आता सर्वसामान्य लोकांपर्यंत लोक कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी पुढाकार घेईल तसेच अशा शब्दात राहून लोणकर यांनी आगामी काळातील युवा मोर्चाची रणनीती सांगितली.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याला यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता त्याचप्रमाणे सद्यस्थितीत देखील लोणीकर खंबीरपणे परभणी जिल्ह्याच्या पाठीशी उभे असून लोणीकरांचा तोच वारसा जपत राहुल लोणीकरांच्या माध्यमातून देखील अधिकाधिक प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा परभणी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी व्यक्त केली

यावेळी मंचावर भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर भारतीय जनता पार्टीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम बाळासाहेब जाधव प्रमोद वाकोडकर अंकुशराव बोराडे रामराव लावणीकर प्रल्हादराव बोराडे नितीन नाईकनवरे परभणी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे रामदास पवार जालना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजपा परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ सुभाष कदम हभप रमेश महाराज वाघ,चंद्रकांत डहाळे लक्ष्मणराव रोकडे शिवाजीराव दिवटे सुभाष दादा जावळे सुभाष देंडगे सुभाषराव आंबट जिजाबाई जाधव गणेशराव खवणे माऊली शेजुळ विलासराव आकात अंसाबाई राठोड सुभाष राठोड कैलास बोराडे अंकुशराव बोराडे रमेश भापकर सतीश निर्वळ प्रकाश टकले संजय तौर राजेश मोरे शिवहरी खिस्ते राजेश वट्टमवार सुदाम प्रधान किशोर हानवते भगवान सरकटे नागेशराव घारे कृष्णा आरगडे शत्रुघ्न कणसे गजानन उफाड अशोक बरकुले सुरेश सोळंके बंडू मानवतकर रवी सोळंके संपत टकले जयश्री पवार माऊली सोळंके हनुमंतराव उफाड प्रसादराव बोराडे विठ्ठलराव काळे केशव ढवळे सिद्धेश्वर केकान महादेव वाघमारे कृष्णा मोटे सुधाकरराव सातोनकर गणेशराव पवार रंगनाथ येवले रामेश्वर तनपुरे अंकुशराव कदम लक्ष्मणराव टेकाळे शिवदास हानवते सोपानराव वायाळ शहाजीराक्षे माऊली गोंडगे विलास घोडके उद्धवराव गोंडगे भगवानराव मोरे शिवाजी पाईकराव लक्ष्मणराव पवार गोविंद ढेंबरे कैलास चव्हाण गणेशराव चव्हाण प्रदीप ढवळे महेश पवार राजू वायाळ संभाजी वारे रामकिसन बोडके संजय छल्लाणी बाबुराव शहाणे राजेभाऊ खराबे दत्तात्रय खराबे मुस्तफा पठाण गंगाधर पवार प्रकाश चव्हाण प्रमोद राठोड प्रवीण सातोनकर सोनू अग्रवाल ज्ञानेश्वर जईद सिद्धेश्वर सोळंके गजानन लोणीकर भगवान आरडे नारायण बिडवे पद्माकर कवडे मलिक कुरेशी बाबाराव थोरात दिलीप थोरात बबलू सातपुते नसरुल्ला काकड रमेश राठोड सिताराम राठोड संभाजीराव खवल संभाजी शिंदे मिरज खतीब कैलास बोणगे रामजी कोरडे सतीश कुलकर्णी नदीम शेख गुलाब सावंत रमेश चव्हाण रमेश आढाव श्याम सुंदर चितोडा यांच्यासह डॉक्टर वकील व्यापारी शिक्षक प्राध्यापक यांच्यासह शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले