ह.भ.प. भागवताचा-र्या रूपालीताई सवने यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर यांच्या वतीने राष्ट्रवादी कोंग्रेस सेवादलचे मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथील महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार माजी गृहराज्य मंत्री आमदार संजय बनसोडे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.   
ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी करत असलेल्या धर्म जागृतीचा, संस्कार जागरणाचा आणि ज्ञान साधनेचा प्रचार आणि प्रसार करून शब्दसिध्दी अमृतवानीने कीर्तनाने आणि प्रबोधनाने समाज प्रभावित होत आहे.  महाराष्ट्रात केलेल्या व करत असलेल्या धर्म, संस्कृती आणि नैतिक मूल्यांच्या जागरणामुळे गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळातर्फे ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना दि २२ आक्टोंबर २०२२ रोजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पूर्वी ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना झी टॉकीजच्या वतीने नुकतेच एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....