युवा ऊद्योजक शरद पाटील दहातोडे याच्या अभिष्टचितंना निमित्य किर्तन संपन्न
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
येथून जवळच असलेल्या देवठाणा येथे हं भ प प्रसाद महाराज काष्टे याच्या किर्तनाचे आयोजन करण्या आले होते संत नामदेव महाराज याच्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझीया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहकांराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णु दासा भावीकासी
या संत नामदेव महाराज याच्या अभंगावर निरुपण केले संत हे काहीच मागत नसतात याचा अर्थ असा होत नाही की ते काहीच मागत नाही संत हे समाजासाठी धर्मासाठी मागणे मागत असतात जे संत स्वःत साठी काही मागतात ते संत होऊ शकत नाही आणि समाजही अशा ना स्वीकारत नाही संत हे किती महान आहेत संतांनी संतांना उठवले संतानी जीवाला उठवले संतांचे वर्णन हे शब्दात मनुष्य करू शकत नाही संतांनी देवाला सुध्दा उठवले ऐवढा मोठा अधिकार संतांचा आहे संत हे त्यागाचे प्रतिक असतात त्याग निष्ठा समर्पण हे संतांनकडून शिकले पाहीजे पंरतू मनुष्य हा दोष बघण्यातच धन्यता मानतो बरेच माणसे दुसर्याना जागे करतात माञ जागे करणारा स्वतःचे अस्तीत्व विसरून जातो दुसर्याचे दोष काढण्यातच तो व्यस्त असतो जे संत दुसर्यासाठी काही मागतात ते महानच असतात असेच संत जगासमोर एक आदर्श निर्माण करता त्याच आदर्शा समोर समाज नतमस्तक झाल्याशिवाय राहत राहत नाही
जिव देवाकडे एकच मागणी करत असतो देवा माझी संतती संपती वाढू दे ही अव्यवहारीक मागणी देवाकडे करू लागतो पंरतू संताची मागणी ही जगाच्या उधारासाठी असते पंरतू मनुष्याची असलेली लोभी मागणी ही परमार्थीक उध्दारासाठी चुकीचीच असते यासाठी तुकोबारायाच्या जिवनाचा आदर्श आपण परमार्थीक आयुष्यात घेतला पाहीजे संसारिक मोहाचा तिरस्कार करून परमार्थीक मोहाच्या आहारी जाऊन स्वःतचा उध्दार करून घेतला व त्या साधन मध्ये कुठलीही संसारीक बाधा न आनता वैकूठ प्राप्त करुन जगासमोर त्यागाचा मोठा आदर्श ठेवला
आज कालच्या या धावपळीच्या युगात मनुष्य जसा शारीरीक व्यसनाच्या आधीन गेला तसा तो अंहकार रुपी व्यसनाच्या सुध्दा आहारी गेला आहे एक शारीरीक व्यसन सुटू शकेल पंरतू मनुष्याचा अंहकांर हा सुटत नाही जो की त्याच्या संसारीक जीवनासाठी घातक आहे सर्व शक्तीमान रावणाचा अहंकार सुध्दा त्याच्या सर्वनाशाचे कारण बनले अहकांर हा अज्ञानी माणसाला होत नसून तो ज्ञानी माणसाला होत असल्याने त्या ज्ञानी माणसाला समाजात शून्य किमत असते संत ज्ञानोबाराय यांनी अहंकारी मनुष्याबद्दल खूप छान सागीतले आहे नवल अहकांराची गोठी ॥ विषेश न लागे अज्ञाना पाठी॥ सज्ञानाच्या झोबे कंठी ॥ नाना सकटी नाचवी या ओवीचा आदर्श समोर ठेवून मनूष्यानी वाटचाल करून स्वःत चा उद्धार करून घेणे गरजेचे आहे
हिन्दूं सस्कृती ही जगामध्ये श्रष्ठ असून सध्या तिच्यावर अनेक प्रकारचे घात करण्याचे कारस्थान चालू आहे ही कारस्थाने हाणून पाडण्यासाठी आपल्याला जातीपातीच्या भितीं तोडाव्या लागतील व एकसंघ राहून अशा प्रवृत्तीना ठेचून काढून जगासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन यावेळी महाराजांनी केले
या वाढदीवसाच्या निमित्याने विविध सामाजीक उपक्रम शरद पाटील मिञ मंडळाच्या वतीने राबवण्यात आले श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विध्यार्थानी साथ संगत केली यावेळी . अर्जुन महाराज बादाड विष्णू महाराज बादाड शालीकराम टेकाळे प्रमेश्वर मोरे डॉ अमोल पाटील डॉ रवि देशमुख बबन मोरे अशोर मोरे सोपानराव पाटील विष्णू देशमुख आदी देवठाणा ग्रामस्थ उपस्थीत होते