परतूर येथे शरद युवा संवाद यात्रा निमित्त भव्य मोटारसाकल रॅली चे आयोजन
परतूर दी.16 प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर येथे दी 17 रोजी सकाळी दहा वाजता शरद युवा संवाद यात्रा निमित्त भव्य मोटारसाकल रॅली चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात यांनी एका पत्रकाद्वारे दिली. दिलेल्या पत्रकत नमूद करण्यात आले की राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेत्रत्वत पूर्ण महाराष्ट्र त शरद युवा यात्रा संवाद हा कार्यक्रम रबावण्यात येत आहे.
या अनुषंगाने युवकांशी संवाद साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे काम तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचविण्यात येणार आहे. तसेच या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली ला उपस्थित राहण्याचे अहवान युवक चे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात सह मा नगरअध्यक्ष विनायक काळे, अंकुशराव तेलगड, विजय राखे, अखिल काजी, युवकचे तालुका अध्यक्ष ओंकार काटे सह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.