मंठा येथे 10 कोटी रुपये किंमतीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाच्या इमारतीचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण

मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
शिक्षण हे वाघिणीचे दूध असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा मूलमंत्र ध्यानात ठेवून मतदार संघातील मंठा आणि परतूर येथे मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने अनुक्रमे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणत वस्तीग्रह इमारती बांधल्या असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते मंठा ता मंठा येथे मागासवर्गीय मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाच्या इमारतीच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी गेली 40 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत असताना दीन दलित पीडित दुबळ्यांची सेवा करताना आपल्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा फायदा मतदारसंघांमध्ये वाडी वस्ती तांड्यावर विकास कामे आणण्यासाठी उपयोग केला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले, मतदार संघातील दलित वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देताना 200 च्या वर गावांमध्ये दलित वस्त्यांमधील विकास कामे पूर्ण केली तसेच 200 च्या वर गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधली असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्यामध्ये सिमेंट रस्ते असतील नाल्या असतील वीज वितरण ची कामे असतील अशी सर्व कामे जातीने लक्ष देत पूर्ण केल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले,, समाजाच्या सर्व घटकांचा विकास व्हावा याकडे लक्ष केंद्रित करत असताना विविध योजनांची अंमलबजावणी केली
ज्या दिवशी या वस्तीगृहातील मुली मोठ्या पदावर जसे कलेक्टर डॉक्टर वकील इंजिनियर बनतील त्याच दिवशी खऱ्या अर्थाने मी समाधानी होईल असेही यावेळी आमदार बबनराव लोणीकर असल्याचे ही यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले गेल्या 40 वर्षात इथल्या प्रत्येक समाजाने माझ्यावर प्रेम केलेले असून, इथल्या दलित पीडित समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास करणे आपली जबाबदारी असल्याचे सांगतानाच ते म्हणाले की, हे उत्तरदायित्व आणि होत असताना सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अकराशेच्या वर सर्व धर्मीय मुलींचे विवाह लावून देत कन्यादान केले येत्या काळातील आपण मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून आपण मंत्री असताना मतदार संघासाठी 4700 कोटी रुपयांचा निधी आणत मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले हे करत असतानाच परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची तहान भागवी यासाठी मतदारसंघासाठी स्वतंत्र वाटर ग्रीड मंजूर करून घेत, आज मतदारसंघातील 195 वर गावांना या ग्रीडच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे, त्याचबरोबर उर्वरित मंठा तालुक्यातील 95 गावाची ग्रीड वॉटर फिल्टर योजना लवकरच पूर्णत्वास जाणार असून तालुक्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले की शेगाव पंढरपूर सारखा महत्वकांक्षी दिंडी मार्ग आपल्या मतदारसंघातून आणण्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत हा महामार्ग मंजूर करून घेतला त्याचे काम आता पूर्ण झाले असून मतदारसंघातील दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला असल्याचेही ते म्हणाले, हे करत असतानाच शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना ची अंमलबजावणी करताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघातील 103 गावांचा समावेश या योजनेमध्ये करून या भागातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्या माध्यमातून आज घडीला परतुर व मंठा तालुक्यामध्ये जवळपास 42 कोटी रुपयांचा निधी वैयक्तिक लाभापोटी खर्च करण्यात आलेला असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर ट्रॅक्टर शेततळे शेती अवजारे ठिबक आदी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ झालेला असल्याचेही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
यावेळी गणेशराव खवणे ,भाजपा ता अध्यक्ष सतीश निर्वळ,प्रल्हादराव बोराडे,नागेश घारे,संजय भालेराव, सुदामराव प्रधान,शाहाजी राक्षे, मा सभापती स्मिता राजेश मस्के, जि प सदस्य रेणुका शिवदास हनवते, भगवान कांबळे, राहुल कांबळे, रामा मोरे ,प्रसाद बोराडे, कैलास बोराडे विलास घोडके, विठ्ठलराव काळे राजेभाऊ खराबे गजानन देशमुख ज्ञानेश्वर वायाळ अविनाश राठोड भगवानराव लहाने भीमराव वाघ संजय सहजराव बाळासाहेब वांजोळकर रावसाहेब खरात महादेव खरात नवनाथ चट्टे कैलास चव्हाण बंडू कवळे एन डी दवणे जयश्री पवार सचिन वाघमारे इंदुबाई लहाने उद्धवराव सरोदे इंद्रजीत मगर नंदकुमार घोडे प्रकाशराव खाडे रमेश राव गायकवाड मदन कुरेवाड डॉ प्रा सुरेंद्र खाडे
उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख उपकार्यकारी अभियंता नेवारे कंत्राटदार सुनील अग्रवाल गटविकास अधिकारी थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश