यश ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट येथे बाल दिन उत्साहात साजरा

 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     तालुक्यातील सातोना येथील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना येथे आज पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
     चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक शामीर शेख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बहुरूपी कैलास शिंदे व भारत शिंदे, विलास गोरे यांची उपस्थिती होती. यावेळी शामीर शेख, जयराम खंदारे यांनी चिमुकल्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.तसेच बहुरूपीनी सुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर हसवले. मुलांनीही चाचा नेहरूविषयी मनोगत व्यक्त केली.
  दरम्यान विविध पशु पक्ष्याच्या वेशभूशेत आलेल्या विद्यार्थ्यांनी बालमित्रांना संगीताच्या जोमात मनसोक्त आनंद दिला. यावेळी येथील शिक्षकांनी विविध खेळांचे आयोजनही केले होते.अनेक मुलांनी प्राण्यांची आवाज काढली. कोणी गाणी म्हणली. यात शिक्षकांनीही जणु बालपणात जाऊन बालगोपालसोबत आस्वाद घेतला.यावेळी मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश गोरे यांनी तर आभार अश्विनी कोळपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा सावंत, राधिका आकात, सीमा पवार, महादेव गायकवाड,मंजुषा बोराडे, मालन सु्रोडकर, निलेश यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात