वाहेगाव येथे हभप रुपालीताई सवने महाराज यांचे कीर्तन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तालुक्यातील वाहेगाव (सोपारा) येथे दि २२ नोहेंबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील *सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम हभप रुपालीताई रामेश्वर महाराज सवने* यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजीत कीर्तन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे यांनी केले आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.