शिवसेना परतुर तालुका प्रमुखपदी सुदर्शन सोळंके यांची निवड
परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील शिवसेनेचे जुने कार्यकर्ते सुदर्शन बप्पा सोळंके यांची शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी निवड घोषित करण्यात आली. पूर्वीचे तालुकाप्रमुख अशोक आघाव यांना पद उन्नती देत मंठा, परतूर तालुका समनवयक म्हणून निवडण्यात आली. शिवसेना भवन मुबई येथून सदरील निवडी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी पत्रकारांना दिली. यानिवडीबद्दल त्यांचे शिवसेनेचे जेष्ठ नेते रामेश्वर अण्णा नळगे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड ,उपतालुका प्रमुख रामचंद्र काळे, संजय गोंडगे, शिव वाहतूक संघटना तालुकाध्यक्ष रामजी अण्णा सोळंके
शहरप्रमुख विदूर जैद , युवानेते गजु भाऊ चौडे, रामजी खवल, अशोक काका सोळंके , संतोष ठोंबरे भास्कर तात्या सोळंके , दुष्यंत ठोंबरे, बाळू गाते, सुदाम कदम, प्रमोद सोळंके, प्रभाकर सोळंके, गजानन सोळंके यांच्या प्रमुख उपस्तीतीत स्वागत करण्यात आले. दरम्यान या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, जिल्ह्यात शिवसेनेची नवी कार्यकारणी घोषित करण्यात आली असून, यात सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून सन्मान देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. शिवसेनेचे द्येय धोरणे सर्वांपर्यंत पोहचावा व उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहत, शिवसेनेचा झंझावत नव्यानं निर्माण करा असे आहवन त्यांनी यावेळी केले.