मंठा येथे भव्य शोभायात्रेत प.पू. राधाकृष्णजी महाराज यांचे ठिकठिकाणी स्वागत


मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
     दि.१२ गोवत्स प.पू. राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला १३ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून शनिवार (ता.१२) रोजी निघालेल्या शोभायात्रेत भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गणेश लॉन्स मंगल कार्यालय येथून निघालेल्या शोभायात्रेत शहरातील विविध शाळेचे लेझीम, विविध सजीव देखावे, पारंपरिक बंजारा वेशभूषेतील पथकासह मंगल कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
       राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये प्रभात फेरी मंडळासह शहरातील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथामध्ये स्वार प.पू. राधाकृष्णजी महाराज यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव झाला. ही शोभायात्रा मेन रोडने गोवर्धन धाम कथास्थळी पोहोचली. रस्त्याने नागरिकांनी भावीक भक्तांसाठी दूध व पाण्याची व्यवस्था केली होती. परमपूज्य महाराजांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कथा स्थानी भव्य दिव्य स्वरूपाची तयारी करण्यात आली आहे. श्रीमद भागवत कथास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्थेबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पाहणी केली व पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी कथेचे यजमान दत्तप्रसाद झवर, रामकृष्णहरी प्रभात फेरी मंडळाचे जुगल किशोर कासट, श्रीराम लखोटिया, आनंदराम सोमानी, अंकुशराव अवचार, प्रल्हादराव बोराडे, गोविंदप्रसाद भांगडिया, संतोष वरकड, विक्रम माने, सुभाषराव घारे, बाबुजी तिवारी, प्रदीप देशमुख, गणेशराव शहाणे, श्रीरंगराव खरात, अजय अवचार, उदय बोराडे, राधेश्याम बियाणी, डॉ नितीन मानधने, बाळुसेठ लखोटीया, यावेळी मंठा शहरासह पंचक्रोशीतील अनेक भाविक तसेच जालना, सेलू, जिंतूर, परळी, परभणी, येथील समाज बांधव व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत