जि .प.प्रशाला परतुर येथे शालेय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि.23नोव्हेंबर वार बुधवार रोजी जि प प्रशाला परतुर येथे तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, क्रीडा संयोजक प्रमोद राठोड, क्रिकेट पटू संतोष शर्मा ,सम्राट अशोक मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष हिवाळे, राजू सुरसुरवाले, निलेश सरदार सर, विलास काकडे, परिमल सर व ब्राईट स्टार शाळेचे क्रीडा शिक्षक गजानन कुकडे इ. मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग नोंदवला होता.14 वर्षाखालील मुलांमध्ये विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळेचा संघ विजयी झाला पंच म्हणून शरीफ व आकश जाधव गुण लेखक किशोर ,प्रेम , पवार यांनी काम पाहिले असून या संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, संयोजक प्रमोद राठोड, आशिष कन्सल सहाय्यक विकास काळे व क्रीडा प्रसिद्धीप्रमुख गजानन कुकडे सर यांनी अभिनंदन केले