प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाचा आनंदोत्सव माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर करणार साजरा,निधोना जि जालना येथे, सकाळी 10 वाजता करणार आनंद उत्सव साजरा
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दिनांक 11 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नागपूर ते मुंबई स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असून या लोकार्पणाचा आनंद उत्सव भाजपा आमदार बबनराव लोणीकर जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील निधोना येथे साजरा करणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना थेट नागपूर ते मुंबई हे अंतर काही तासात पार करता येणार असून यामुळे सर्वसामान्य बरोबरच व्यापारी शेतकरी यांना आपला माल थेट काही तासातच मुंबई येथे पोहोचवता येणार आहे या माध्यमातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातील नागरिकांना अति जलद सुविधा उपलब्ध होणार असून यामुळे खऱ्या अर्थाने राज्याचा विकासाची नवी दिशा सापडणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या पत्रकात नमूद केली आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे नागपूर येथे या मार्गाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत
या देशाला व राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणाऱ्या महामार्गाच्या लोकार्पणाचा आपण आनंद उत्सव साजरा करणार असून यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, ह भ प रमेश महाराज वाघ ओमप्रकाश चितळकर वीरेंद्र धोका सागर बर्दापूरकर सुजित जोगस, संदीप हिवराळे, अश्विनी आंधळे, सचिन गाडे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याची उपस्थिती राहणार आहे