योगानंद विद्यालयाचा वयोगट 17 मुलांचा संघ जालनाजिल्ह्यात प्रथम

 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
जि.जालना येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे 17 वर्षे वयोगटातीvल मुलांचे क्रिकेट सामने पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत ठेवण्यात आले होते त्यात वयोगट 17 मुलांच्या क्रिकेट मध्ये जिल्हा स्तरिय स्पर्धेत परतूर येथील श्री योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला पोदार शाळे सोबत अंतिम सामन्यात योगानंद शाळेच्या यश चव्हाण व कर्णधार वीरेन बागल यांनी नेत्रदीपक कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला.
 सर्व खेळाडू व प्रशिक्षक परिमल पेडगावकर यांचे योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी मुख्यध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ रेखा परदेशी , प्रा. शेळके , तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड  , आकाश गोरे , विद्यालयाचा माजी विद्यार्थी शरीफ शेख, प्रशांत पवार यांनी अभिनंदन केले आहे व पुढील विभागीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश