सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम विभाग जालना यांच्यातर्फे 55 वंचित मजूरना सुरक्षा किट वाटप
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार मजुरांसाठी भरपूर काही अशा योजना राबवत आहेत या योजना गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ही बाब सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुर चे सनी गायकवाड यांच्या लक्षात येताच,तीन वर्षापासून सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुर चे सनी गायकवाड यांच्या वतीने वंचित घटकातील कामगार यांना त्यांच्या हक्काची योजना त्यांच्या परत पोहोचत नव्हती ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे तीन वर्षापासून सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक योजनेचा लाभ त्यांना देण्यात आला आहे आज पण तब्बल 50 कामगारांना कामगार ऑफिस जालना येथून सनी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे त्या कामगारास पन्नास सुरक्षा किट च वितरण करण्यात आला तसेच किट मिळतात सर्व कामगारां न सनी गायकवाड यांचे मनापासून आभार मानले
सनी गायकवाड बोलताना असे म्हणाले की जालना जिल्ह्यातील जे कोणतीही शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी जर गजवंत व वंचित लोकांचे काम होत नसतील तर सन ऑफ आंबेडकर ग्रुप च्या माध्यमातून आम्ही त्यांचे काम करून देऊ या अगोदरही सनी गायकवाड यांनी भरपूर असे समाजहिताचे व वंचित लोकांचे कामे करून दिले राशन कार्ड असो उत्पन्न प्रमाणपत्र असो कास्ट सर्टिफिकेट असो व कास्ट व्हॅलेडीटी असो व विधवा महिलांचे अर्थसहाय योजनेमधील वीस हजार भेटतात ते काम असो त्यांनी परिपूर्ण त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या वंचित घटकापर्यंत त्यांनी ती योजना शासन दरबारी खेचून आणून त्यांना देण्यात आली तसेच यापुढेही परतुर तालुक्यातील कोणत्याही घटकातील व समाजातील व्यक्तींना शासकीय कामात जर अडथळा येत असेल तर तिथे नक्कीच सन ऑफ आंबेडकर ग्रुप ची सर्व टीम त्या वंचित नागरिकांच्या पाठी असेल