जागतिक एड्स दिनानिमित्त परतूर येथे भव्य रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही.
यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. याविषयी जनजागृती व्हावी यासाठी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतुर व आय एस आर एस डी जालना यांच्यामार्फत जवाहर नवोदय विद्यालय अंबा व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंबा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना एच आय व्ही होण्याची कारणे व त्यावर करण्यात येणारे उपचार याविषयी डॉ. उनवणे व श्री.शिवहरी डोळे यांनी सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन करण्यात आले.तसेच विद्यार्थीनींची मानवी साखळी तयार करून एड्स निर्मूलनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला. व एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीशी भेदभाव न करण्याची शपथ घेण्यात आली..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.महादेव उनवणे एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राचे समुपदेशक शिवहरी डोळे, एल.डब्लू.एस. चे विभागीय पर्यवेक्षक निलेश चव्हाण, नरेश कांबळे, सिद्धेश्वर वायगुडगे, आर.के.एस.के.च्या मनिषा पंडीत, समुपदेशक दिपक काळदाते विशेष यांनी परिश्रम घेतले.
यावेळी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य नागदेवते सर,उप प्रा.म्हस्के सर,खोलगे सर, जैन सर, श्रीमती सुनीता हे उपस्थित होते व कस्तुरबा गांधी प्राचार्य ज्योती साळवे, श्रीमती चौरे, श्रीमती गोरे, श्रीमती दीपा, श्रीमती कुलकर्णी,भगत सर,लोखंडे सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते..