परतुर शहरातील बालाजी नगर मध्ये घाणीचे साम्राज्य भर वस्तीमध्ये सांडपाण्याचे मोठे डबके साचल्याने नागरिकांना सहन करावा लागतो प्रचंड त्रास,साचलेल्या पाण्याच्या डब्याला वळसा घालून करावा लागतो जीवघेणा प्रवास,नागरिकांचे आरोग्य धोक्यात,बालाजी नगर च्या रहिवाशांनी नरेश कांबळे यांच्या समोर मांडल्या व्यथा*

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 परतूर शहरातील बालाजी नगर वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून सांडपाण्याची टपके आणि भर वस्तीमध्ये साचल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वस्ती मधून बाहेर पडताना नागरिकांना वळण रस्ता वापरावा लागत आहे या संदर्भामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते नरेश कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालिका प्रशासनाची उदासीनता या गोष्टीस कारणीभूत असून स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष या बाबीकडे होत असल्यामुळे येथे हे भले मोठे पाण्याचे डबके तलावाच्या स्वरूपात मध्यभागी असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
या भागातील नागरिक नियमितपणे नगरपालिकेच्या संपर्कात राहून सदरील घाण पाण्याचे डबके स्वच्छ करा अशा प्रकारची मागणी करत असतानाही पालिकेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी मात्र उडवा उडीचे उत्तरे देऊन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचेही नरेश कांबळे यांनी पत्रकात नमूद केली आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की या भागामध्ये अनेक शिक्षक मंडळी,डॉक्टर मंडळी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच हातावर पोट भरणारे नागरीक राहतात तरीही नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करीत असून यासंदर्भामध्ये नरेश कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून पालिकेला निर्वाणीचा इशारा दिला असून तत्काळ या भागाची स्वच्छता न केल्यास स्थानिक नागरिकासह पालिके समोर उपोषणास बसणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
       या निवेदनावर राजेश हरिभाऊ थोरात, नारायण थोरात,नरेश सोनवणे,पूनमचंद फुलमाळी,रतन सुखदेव कदम,नारायणराव धायसकर, नुसरत बेगम अमर शेख,राणी कृष्णा शेंडगे,संगीता संतोष सावसके,अनिल प्रल्हाद अंभोरे,दामोदर नरसिंग हनवते,विकास यादव,सद्दाम आतिफ खान पठाण,दिनेश चिकने,गोकुळ कदम,गंगाधर प्रल्हाद बिडवे,किशोर सावसके, अमोल केवारे,खाजा जुम्मा खान पठाण, रामा आश्रुबा सुरवसे, भागवत रामा सुरवसे,सेवक रामा सुतार,प्रदीप सुतार,पंडित देशपांडे,ऋषिकेश धायसकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.