आष्टी परिसरात अन्न व उत्पादन शुल्क व पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे मोठ्या जोमात,आष्टी पोलिसा सह अन्न उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांचे नियम धाब्यावर
  प्रतिनिधी कैलास चव्हाण 
परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू व गुटखा मोठया प्रमाणात खुले आम पान टपरीवर धाब्यावर विक्री सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. मात्र अन्न व उत्पादन शुल्क अधिकार्या सह एलसीबी चे अधिकारी तसेच आष्टी पोलीसांची खुली परवानगी दिल्या प्रमाणे जाणीव पूर्वक पणे डोळे झाक करत आहे आष्टी सह परिसरात, देशी विदेशी दारू , गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची खुले आम विक्री हॉटेल,किराणा दुकान,पानटपरीवरून अवैध विक्री सुरू आहे. तर धाब्यावर मोठया प्रमाणात अवैद्य दारू विक्री होत आहे याकडे अन्न व उत्पादन शुल्क अधिकार्या सह आष्टी पोलीसांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.आष्टी शहरात बनावट दारू व गुटखा माफियांकडून आष्टी व परिसरात जवळील खेडे गावात बनावट दारू गुटखा पुरवठा केला जातोय. यातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे यामुळे मात्र अल्पवयीन तरुण व शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थी व्यसनाधीन होत आहे तर बनावट दारू ही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.या मुळे नागरिकांच्या आरोग्यासं मोठी हानी हिण्याची शक्यता आहे पण अन्न व उत्पादन शुल्क अधिकारी आष्टी पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे तर अनेक वेळा उपवसात, उत्सवात भगर खाल्याने विषबाधा झाल्याने अन्न औषधी विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. मात्र अवैधरीत्या सुरू असलेल्या गुटखा दारू विक्री विरुद्ध कारवाई कधी करणार असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थितीत करत आहे
                मागील एक वर्षा अगोदर आष्टी जवळील लोणी येथील जन्मदात्या आईला जीवे मारल्याची घटना दारूमुळे मुलाने खून केल्याची घटना घडली होती तरीसुद्धा आष्टी व परिसरात दारू विक्री मोठ्या जोमात चालू आहे. या दारू विक्रेत्यावर कारवाई होणार कि नाही असा प्रश्न आष्टी परिसरातील नागरिकांनी उपस्थितीत केला आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.