यंदाचा परीट धोबी समाजाच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार नगरसेवक कृष्णा अरगडे यांना प्रदान,सदैव समाजाच्या ऋणात राहील समाजकार्यासाठी नियमितपणे हाक द्या मी साथ देईल- कृष्णा अरगडे

जालना  प्रतिनिधी समाधान खरात 
अतिशय मनाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा जालना जिल्हा समाज भूषण पुरस्कार धोबी परीट समाजाचे कार्यकर्ते परतूर येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कृष्ण आरगडे यांना जालना येथे प्रदान करण्यात आला
यावेळी बोलताना कृष्णा आरगडे यांनी आपल्यावर समाजाचे ऋण असून समाजाचे उत्तरदायित्व निभवण्यासाठी आपण सदैव समाजसेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले 
    पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजाच्या सेवेत सदैव असून समाजकार्य करण्यासाठी मला केव्हाही हाक द्या मी साथ देण्यासाठी तयार असल्याचे धोबी परीट समाजाचे युवा कार्यकर्ते कृष्णा आरगडे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले की संत गाडगेबाबांनी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात मला जन्म मिळाला याचा मला सार्थ अभिमान असून जगकल्यासाठी मला जे जे करता येईल त्यासाठी मी सदैव तत्पर असून कुठल्याही सामाजिक उपक्रम संदर्भामध्ये आपण पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
माझ्या आईने केलेले संस्कार हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून तिच्या संस्कारामुळेच आज समाज बांधवांच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा मोठा पुरस्कार मला प्राप्त झाला असून माझा हा पुरस्कार माझ्या आई प्रति मी समर्पित करीत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
आपल्या समाजातील युवकांची अवस्था अतिशय बिकट असून त्यासाठी आपण एक संघ होऊन काम केल्यास निश्चित पराडी समाजातील युवकांना दिशा देण्याचे काम होईल असे सांगतानाच युवकांनी आपली शक्ती विधायक कामासाठी खर्च करावी असे यावेळी त्यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की माझे भाग्य आहे की मी कुठल्याही इतर मार्गाने जाता सामाजिक क्षेत्रात काम करत असताना दिलीप दुबळ्याची सेवा करू शकलो त्यामुळे युवकांनी विचारपूर्वक आपली कर्तत्व सिद्ध करण्यासाठी योग्य वर्गाची निवड करून सभा सेवेबरोबरच स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
या वेळी कृष्णा आरगडे यांचा शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाला समाजातील जेष्ठ कार्यकर्ते हिरालाल इंगळे पर्यावरण प्रेमी उदय शिंदे मा नगरसेवक सुभाष वाघमारे, मोहन इंगळे पत्रकार किशोर आगळे अनिल खंडाळे, वसंतराव राऊत अशोक जाधव गणेश इंगळे काशिनाथ मेहुणकर रमेश पैठणकर प्रतीक इंगळे सचिन शिंदे सुभाष घोडके संतोष शिंदे मंगेश इंगळे राहुल वाघमारे दिगंबर इंगळे नकुल राऊत दत्ता घोडके विवेक पाटील शंकर काळे बळीराम मोरे, मनीष जाधव, महेश मेहुनकर, दत्ता जाधव गोपी काळे, संदीप वाघ प्रवीण डुकरे आदी ची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड