शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटील यांना विजयी करा-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,12 जानेवारी रोजी उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिक्षक मतदार संघामध्ये शिक्षकांचा योग्य आमदार निवडून न दिल्यामुळे मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
ते परतूर येथे आयोजित विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी बैठकीमध्ये बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीने दिलेला चरित्र संपन्न सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार किरण पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित मंठा जालना आणी परतूर येथील शिक्षकांना केले.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शिक्षकाच्या पेन्शनचा प्रश्न असो विनाअनुदानित शाळांचा प्रश्न असो विद्यार्थी गुणवत्तेचा प्रश्न असो या सर्व प्रश्नाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान शिक्षक आमदारांनी कधीच लक्ष दिले नाही ते शिक्षकांचे आमदार नव्हतेच ते तर फक्त राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिरवले त्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले मराठवाड्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याची आणि ते प्रश्न सोडवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रश्न निकाली निघतील. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किरण पाटील यांनी पुढाकार घेत विनाअनुदानित शिक्षकांचा अंशतः अनुदानाचा प्रश्न सोडवताना 60000 शिक्षकांचा प्रश्न नागपूर येथे झालेले हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सोडवला.
राज्यातील सरकार सर्वच घटकांचा विचार करणारे सरकार असून त्यात शिक्षक व्यापारी शेतकरी कष्टकरी दिन दलित या सर्वांचाच विचार करणारे असून त्यामुळे शिक्षकांनी येथे निवडणुकीमध्ये मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांना भरभरून मतदान करावे अशी आवाहन यावेळी आमदार लोणीकर यांनी जालना मंठा आणी परतूर येथील उपस्थिताना केले
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सरकारने कायम विना अनुदानाचे धोरण आणून मोठा अन्याय शिक्षण क्षेत्रावर केला होता असे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिक्षक बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भगवानराव मोरे दया काटे मनोहर पेडगावकर रामप्रसाद थोरात हरीश खैरे कैलास राठोड बदाले सर बाबासाहेब थोरात देशपांडे साहेब कल्याण बागल संपत टकले उत्तमराव वायाळ केजी राठोड रामेश्वर सोळंके सुरेश पाटोदकर विष्णू कदम श्री तायडे, परिमल पेडगावकर जगन्नाथ रासवे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले