अविनाश कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह अंकुर येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप
परतुर प्रतिनिधी कैलास चव्हाण
येथील युवा सेना चे तालुका प्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना)अविनाश कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथून जवळच असलेले मापेगाव पुनर्वसन या गावात स्नेह अंकुर हे ने अंकुर निराधार विद्यार्थ्यांचे वस्तीग्रह आहे या वस्तीग्रह मध्ये तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले
याप्रसंगी अविनाश कापसे यांचा तेथील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अविनाश कापसे यांनी सांगितले की कुठलाही जाहिरात किंवा बॅनर बाजीवर खर्च करण्यात ऐवजी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आशा निराधार मुलांना मदत केली पाहिजे यामुळे एक आत्मिक समाधान लाभते यापुढेही आपण नेहमीच अशा निराधार मुलांना नेहमीच मदत करत राहू हा उपक्रम आमचे जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेत आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले
या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख,अमोल सुरुग, नितीन राठोड, शिवाजी तरवटे, दत्ता अंभुरे ,अभिजीत सुरुशे, दिपक हीवाळे , गणेश शिंदे, मापेगाव नवनिर्वाचित सरपंच दिनकर शेंडगे, सुरेश कापसे, गणेश जाधव, अशोक टेकाळे, अशोक बेरगूडे ,वीजय गिरी आदी उपस्थित होते
स्नेहा अंकुर चे संचालक प्रदीप कातारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले