बहु आवडेसी जीवापासोनीया कानडीया विठोबा कानडीया वीसी हभप-सोमनाथ महाराज कऱ्हाळे

तळणी प्रतिनिधी रवी पाटिल
     तळणी येथील अंखड हरीनाम सप्ताहात आज पहील्या दिवशीचे किर्तन पूष्प ह भ प सोमनाथ महाराज कऱ्हाळे यानी गुंफले 
   संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय याच्या बहु आवडेसी जीवापासोनीया कानडीया विठोबा कानडीया या अभंगावर चितंन केले या निरुपणा मध्ये विश्ववंदनीय ज्ञानेश्वर महाराज देवाचे महत्व विषद करतात मला देव आवडला पण तो किती आवडला आवडची पराकाष्टा करणारे ज्ञानोबाराय सांगतात देवा तुझी शपथ घेऊन सागतो तुझी आण वाहीन गा पण देवा तु मला किती आवडतो तर बहु आवडीसी जीवा पासोनीया 
प्रत्येकाला ज्याचे त्याचे शरीर प्रिय असते शरीरावर प्रेम करणारी आपण मानसे आहोत शरीराची ठेवण व्यवस्थीत ठेवण्यासाठी आज कालचा तरुण किती तरी तास सलून मध्ये व्यर्थ घालवत आहे मनुष्याला शरीरापेक्षा जीव महत्वाचा वाटतो पण हीच गोष्ट संतांच्या बाबतीत होत नाही खास करुन ज्ञानोबारांय म्हणतात पांडूरगा मला जीवापेक्षा तु महत्वाचा आहे तु मला जास्त आवडतो जीवीचीया जीवा प्रेमभावाचीया भावा तुज वाचुनी केशवा आनु ना आवडे
   मनुष्याला देव आवडण्या आधी देव मान्य असावा लागतो मान्य असणारा देव समजावा लागतो व समजलेला देव भेटावा लागतो मग त्याच्या विषयी आवड निर्माण होते देवा विषयी आवड निर्माण होणे म्हणजे भक्ती संप्रदायातील अतिऊच्छ अवस्था आहे आजच्या या वर्तमान काळामध्ये मनुष्याला काय आवडावे हे सागता येत नाही पण देवाविषयी आवड निर्माण होत असेल तर असे समजावे की मनुष्याची परमार्थीक साधना योग्य दिशेन चालू आहे सप्ताह मध्ये अठरापगड जातीचे लोक या धर्म मंडपामध्ये येतात त्या भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली येतात ही खरी ताकद वारकरी सप्रंदायाची आहे या धर्म मंडपामध्ये मनुष्याला ऊर्जा मिळते संसारीक अध्यात्मिक वाटचाली साठी ती उर्जा कामी येते 
    आज काल मनुष्या मोठया प्रमाणात पैसा आहे पैश्याच्या जोरावर मनुष्य चंद्रांवर जाऊ शकेल पण त्याला खरा अध्यात्मीक आंनद मिळवायचा असेल तर त्याला या सप्ताहच्या धर्म मंडपामध्येच यावे लागेल तो इतर कुठेही मिळणार नाही मनुष्याच्या आनंदासाठी समाधानासाठी जर हा धर्ममंडप सज्ज होत असेल तर प्रत्येकाने येथे यायला हरकत काय आहे सप्ताह मध्ये कुठलीही सेवा करण्यासाठी तत्परता असणे गरजेचे आहे 
   सप्ताह मध्ये विणेकराची भूमिका फार महत्वाची आहे विण्याची सेवा ही चोवीस तासाची सेवा आहे ती तरुणानी केली पाहीजी ती सेवा विणा कारण वाया जाणार नाही 
  मनुष्याने इश्वराला समर्पन केले पाहीजे ज्ञानोबा तुकोबाचे जीवन हे समाजासाठी धर्मासाठी समर्पक जीवन होते म्हणून त्याना देवत्व प्रात्त झाले त्यानी दाखवलेला भक्ती मार्ग मनुष्याच्या उध्दाराचा मार्ग आहे तो तुम्ही आम्ही स्वीकारला पाहीजे सात दिवसाच्या सप्ताह पूरती आपली भक्ती उतू येऊ देऊ नये तिच्यात सात्यत राहीले तर मनुष्याचा उद्धार झाल्याशिवा राहणार नाही असे महाराजानी शेवटी सांगीतले

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले