रक्ताचा वारसा चालविण्या पेक्षा विचाराचा वारसा चलवा - हभप अशोक महाराज ईदगे

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
    तळणी येथे चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताहमध्ये आजच्या पाचव्या दिवशी ह भ प अशोक महारज ईदगे यानी पाचव्या दिवशी पुष्प गुफले जगद गूरू तुकाराम महाराज यांच्या बळीवंत आम्ही समर्थाचे दास घातली या कास कळीकाळासी तेथे माणसाचा कोण आला पाड उल्लोघनी जड गेलो आधी 
या अभंगावर निरूपण केले
    रक्ताचा वारसा चालविण्या पेक्षा विचाराचा वारसा चालंवणे सध्याच्या युगात महत्वाचे आहे मनुष्याला जोपर्यत्न ध्येयाचे वेड लागणार नाही तोपर्यन्त तो यशस्वी होणार नाही जगदगूरू तुकाराम महाराजानी दाश्यत्वाचा मार्ग स्वीकाराला देवाला शरण गेल्याशीवाय तो प्राप्त होत नाही महाराजांनी पांडूरंगाच्या भक्तीत स्वःत ला वाहवून घेतले सर्वसामान्य भक्त सुध्दा जर देवाला जरी शरण गेले तरी त्याच्या कठीण काळात तो ऊभा राहतो मनुष्याच्या जीवनात दोन दुःख आहेत एक जन्माचे आणि दुसरे मरणाचे माता आणि सस्कार हे जवळचे नाते आहेत ते नाते पित्याच्या बाबतीत होऊ शकत नाही कारण पित्याचे आयुष्य हे जोडा जोडीचे आयुष्य असते आज काल प्रत्येक मनुष्य हा सर्व सुख सोई युक्त परीपक्क असला तरी मुत्युचे भय हे कायमचे आहे ज्ञानाचा मार्ग हा कठीण मार्ग आहे मनुष्याने मरण भयाला घाबरले नाही पाहीजे जीवन आंनदात जगले पाहीजे माऊली व तुकोबाना पाऊला पाऊला वर ञास भोगला म्हणून 


अज्ञानी मनुष्य हा जगाला उपदेश करू शकत नाही आणि ज्ञानी मनुष्य सुध्दा जगाला उपदेश करू शकत नाही कारण त्या ज्ञानी मनुष्या समोर जगच नसते मनुष्य हा संसाराचा दास आहे म्हणून तो त्याच्या लौकीकाचा झेडा फडकवू शकत नाही म्हणून संसारीक माणसाने देवाचे दाश्यत्व स्वीकारले पाहीजे तरच आपला उध्दार होईल देवाची मनुष्याने संसारासाठी रडल्यापेक्षा देवासाठी रडले पाहीजे जग जिकण्यांसाठी निघालेले लोक काळाला जिंकू शकले नाही आपण तर सामान्य आहोत आणि सामान्यासाठी आपल्या संतांनी दाखवलेला भक्ती मार्गच आपल्या उद्धाराचे साधन आहे तो भक्ती मार्ग आपण स्वीकारला पाहीजे म्हणून तुकोबारायानी समर्थाचे दास्यत्व स्वीकारले म्हणून काळाला ते घाबरले नाही तुकोबारायांचे जीवन हे सामान्य जीवन जगले मनुष्याचे जीवन हे सामान्यच असले पाहीजे पण त्याचे मरण माञ एक सोहळा असले पाहीजे साधूचे मरण हे क्रांतीकारी असते कारण त्याची साधना असते म्हणून ते साधू त्या योग्यतेचे होत असतात मनुष्याला जर साधूच्या योग्यतेच्या अवस्थेत जायचे असल तर त्याचे जगणे हे साधनेच्या आहारी गेले तरच मनुष्य मुत्यू सोहळ्याच्या योग्यतेचा होतो


मनुष्याला ज्ञानेश्वरीची भूक लागने गरजेचे आहे जोग महारांजानी त्यानी त्याचे सपूर्ण आयूष्य ज्ञानेश्वरी साठी जगले ती ज्ञानेश्वरी गाथा आपल्या उध्दाराची साधने आहेत ती आपण स्वीकारली पाहीजे मनुष्य हा लोभाच्या आहारी गेला आहे सांसारीक मोह मनुष्याचा उध्दारासाठी मोठी अडचण आहे जगदगुरू तुकोबारायांनी सहा मोहावर विजय मिळवला होता म्हणून त्याचे श्रष्ठत्व सिध्द होते छञपतीनी महाराजानी दिलेला नजराण्याचा मोह सुध्दा तुकोबारांयांनी झाला नाही सन्मानजनक रितीने तो नजरांना परत पाठवला तुमचे एरवित धन ते मज मुर्तीके समान याचा स्वीकार मी करू शकत नाही अस नम्रपना जगदगूरू तूकोबा यांच्या अंगी असल्याने त्या काळातही तुकोबाची स्तूती करणारे महात्मे सुध्दा होते त्या काळी होते 

साधुने जसे असेल तसे स्वीकारले पाहीजे अनावश्यक गोष्टीमध्ये साधने हस्तक्षेप टाळला पाहीजे आजकाल साधूचा अनावश्यक हस्तक्षेप वाढत असल्याने साधूची प्रतिमा खराब होत आहे साधूना जो मार्ग दीलाय त्याच मार्गाने त्यानी प्रवास करायला हवा पण सद्यस्थितीत साधूच्या आति हस्तक्षेपामूळे तसे होताना दिसत नाही सद्याच्या काळात वैचारीक अराजकता माजली आहे वैचारीक पातळी खालावली आहे 

परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थी जसा पास होऊ शकत नाही तसेच भक्ती केल्याशिवाय परमार्थीक आयुष्यात मनुष्याला देव कसा प्राप्त होईल ज्ञानाचा मार्ग हा सोपा नाही तलवारीच्या धारेसारखा तो मार्ग धारदार आहे तो मार्ग आपल्या साठी ज्ञानोबा तुकोबानी स्वीकारला आहे त्याच्या विचाराच पाईक आहे त्याला आपण जपल पाहीजे आज काल विविध प्रकारचे आघात आपल्यावर होत आहेत काही जण अधं श्रध्देला बळी पडत आहे अमूक पूजा केली म्हणजे देव भेटतो हा थोतांड पणा आहे देवत्व प्राप्त करायचे असेल तर त्याला साधनेची भक्तीची जोड असेल तरच त्याला देवत्व प्राप्त होईल मनोभावे भक्ती केली तर तो नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट हा संतांनी दिलेल्या वैचारीक साधनेचा पाया भक्कम आहे ज्ञानोबा तुकोबाचा हा महांराष्ट्र असून या संत परपरेचे पाईक आपण असल्याने तो वैचारीक वारसा आपण प्रत्येकाने जर जपला कुठली ताकत आपल्याला स्पर्श करू शकनार. नाही कारण इथे श्रध्देची व्याख्या शिकवली आहे उत्कटपणा कृतीशील झालेली विवेक शक्ती म्हणजे श्रध्दा ओढून ताढून बळजबरीने कुणावरही लादण्याची गरज नाही कारण श्रध्दैचा पाया हा भक्कम असल्याने या मातीचा वारसा हा श्रध्दैचाच असून तो तुम्ही स्वीकारला तरच आपण ज्ञानोबा तुकोबाचे व संत परपंरेच खरे पाईक ठरुत असे महाराजानी शेवटी सांगीतले 

यावेळी शिवाजी महाराज काकडे पांडूरंग भोसले विलास फूपरे सोपान महाराज पेवेकर अंशीराम चव्हाल व संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यानी साथ संगत केली

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश