बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख पदी दीपक हिवाळे यांची निवड

*

पृरतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
       परतुर येथील कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक दीपक हिवाळे यांची नुकत्याच झालेल्या शिवसेना पक्ष सोहळा कार्यक्रमात माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर प्रमुख पाहुणे जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम नाना उढाण, युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे, एँड. अनुराग कपूर, मंठा तालुकाप्रमुख उदयसिंग बोराडे व परतुर तालुका प्रमुख अमोल सुरूंग यांची उपस्थिती होती.
      हिवाळे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कीं ,हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना परतुर शहर प्रमुख पदी आपली निवड करण्यात आलेली आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे असेही दिलेल्या नियुक्तीपात्रात म्हटले आहे. दिलेल्या नियुक्ती पत्रावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांची स्वाक्षरी आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत