500 लक्ष रुपयांच्या 46 सभागृह बांधकामाची शासनाने उठवली स्थगिती,आमदार लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश






जालना प्रतिनिधी समधान खरात
लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा अंतर्गत मतदार संघातील 46 सभागृह बांधकाम कामास स्थगिती देण्यात आली होती. या कामावरील स्थगिती उठावी व मतदार संघात सभागृह निर्माण व्हावीत या उद्देशाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना भेटून स्थगिती उठवण्याची विनंती केली होती.
 शासन निर्णय लेखाशीर्ष 25 15 - 12 38 शासन निर्णय क्रमांक विकास 2022 /प्र. क्र.227 योजना शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाचे उपसचिव का गो वळवी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार परतुर तालुक्यातील आष्टी आसनगाव कोकाटे हादगाव आनंदगाव बानाची वाडी रायगव्हाण लोणी रंगोपंत कनकवाडी सुरमगाव कोरेगाव चिंचोली आंबा ढोकमळ वाटूर बाबुल्तारा कावजवळा तर मंठा तालुक्यातील तळणी पांगरी अर्धा तोलाजी गुळखंड आखणी रानमळा नानसी उमरखेडा पांगरा खोरवड कानडी तळणी केंदळे पोखरी किल्ला तळणी शिवनगिरी बेलोरा देवगाव केंदळी वरुड शेवली पळसखेड एरंडवडगाव सोनदेव वरखेड बाबर पोखरी नेर येथील पाचशे लक्ष रुपयाचे सभागृह बांधकामास परवानगी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी जल्लोसात या शासन निर्णयाची स्वागत करत फटाके फोडून आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांचे आभार मानले आहेत अशी माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. पुढे या पत्रकात तळणी वडगाव सरहद कोकरंबा शिरपूर वाघाळा टाकळखोपा इंचा कानडी देवठाणा दहिफळ आंधवाडी उसवत फॉरवर्ड मोहदरी अंभोरा तिर्तापूर लिंबखेडा हनवत खेडा चिखली तांडा भूरानाईक तांडा गारटेकी चिखली तांडा दुधा सासखेडा किर्ला जांभरण तुपा जयपूर वझर बेलोरा शिवानगिरी यरंडेश्वर कोकरसा माळेगाव दहा दहातांडा देवगावं खवणे तळेगाव केहाळ वडगाव माहोरा वैद्य वडगाव पोखरी टकले अंभोरा गणेशपूर वाढेगाव पांढर्णा ढोकसाळ वरुड वाघोडा खोराड सावंगी पेवा पांगरी माळतोंडी नायगाव पांगरा गडदे किनखेडा पाडळी हेलस विरगव्हाण रामतीर्थ तळतोंडी या मतदार संघातील गावातील पाचशे लक्ष रुपयांचे सिमेंट रस्ता बांधकामावरील स्थगिती आपण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांना भेटून विनंती करून लवकरच उठवणार आहोत. असे म्हटले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....