आष्टी येथे श्री वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराज समाधी दर्शन यात्रा महोत्सवास माजी मंत्री आमदार लोणीकर यांची उपस्थिती,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या वतीने 51 तोळे चांदीचा मुकुट सद्गुरु चरणी अर्पण
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वादाने मी गेली 35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करू शकलो असे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले ते आष्टी ता परतूर येथे श्री वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज सुयोग समाधी दर्शन यात्रा महोत्सव प्रसंगी बोलत होते
यावेळी संत पिठावर सद्गुरु सिद्धलंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा सद्गुरु विश्वचैतन्य महाराज आष्टी सद्गुरु सिद्धलिंग सिद्ध चैतन्य महाराज शिवाचार्य दिगंबर महाराज वसमत यांची प्रमुख उपस्थिती होती
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, घरून आई-वडिलांनी मला राजकारणात न पडण्याचा सल्ला दिला होता त्याचे कारण असे की गावांमध्ये असलेली राजकीय शक्ती इतकी मोठी होती त्यामुळे आई-वडिलांनी माझ्या काळजीपोटी मला राजकारण न करण्याचा सल्ला दिला होता मात्र समाजाची सेवा करणे हा माझा स्थायीभाव होता म्हणून मी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने आष्टी सारख्या गावातून खऱ्या अर्थाने राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेला प्रारंभ केला आणि लोणी गावचा सरपंच ते थेट मंत्रीपदापर्यंत मजल मारू शकलो गेल्या 35 40 वर्षापासून मी राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे उत्तरदायित्व निभवतांना दीन दलित दुबळ्यांची सेवा केली जात धर्मपंथलिंग यापलीकडे जाऊन राजकारणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम माझ्या हातून घडलं ते केवळ साधू संतांच्या आशीर्वादामुळे घडले असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली
साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा याप्रमाणे साधू संतांच्या सानिध्यात राहून राजकारण्याच्या भूमिकेत असूनही धर्मकार्यामध्ये मी सदैव स्वतःला झोकून देत राहिलो या माध्यमातून देहू येथील अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात भोजनाची व्यवस्था शिरावर घेऊन देशभरातून आलेल्या साधुसंत वारकऱ्यांची सेवा केली धर्मकार्यणी होत असताना परतुर विधानसभा मतदारसंघातील अकराशेच्या वर मुला मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून मनी मंगळसूत्र डोरलं भांडीकुंडी पलंग गादी साहित्य देऊन कन्यादान करण्याचं पुण्य मला मिळालं
विकासाला स्थायीभाव म्हणून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी मंत्रिपदाच्या काळामध्ये 4700 कोटीचा निधी आणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आजही निधीचा व तसाच कायम ठेवण्यात आपण यशस्वी ठरलेला असून राजकारणाच्या माध्यमातून निश्चित मनाने परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे काम आपण करत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या वतीने 51 तोळे चांदीचा मुकुट सद्गुरु चरणी अर्पण करण्यात आला
याप्रसंगी लक्ष्मणराव वडले भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुभाषराव कदम सुभाषराव अंबट सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात सुदामराव प्रधान आष्टीचे सरपंच मधुकरराव मोरे गजानन लोणीकर तुकाराम सोळंके रवी सोळंके बबलू सातपुते व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे रामदास काका सोळंके बब्बू टाकळी वाला बाबाराव थोरात अरुणराव पळसे सुमंतराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती