मानव विकास मिशन अंतर्गत परतुर येथील जि प प्रशालेतील विद्यार्थिनींना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले 59 सायकलचे वाटप,मुल मुली शिकल्या पाहिजेत मोठ्या अधिकारी झाल्या पाहिजेत- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो शिक्षण रुपी दूध प्याला त्याला समाजात वावरताना कुठलीही अडचण येत नसून प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श वर चालत शिक्षण घ्यावे असे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते जि प प्रशाला परतूर येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना 59 सायकल वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते
   पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील मुलींना शहरात येऊन शिक्षण घेण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकली वितरित करण्यात येतात या माध्यमातून मुलींनी निश्चितपणाने नियमितपणे शाळेत येऊन अध्ययन करावे जेणेकरून भविष्यात डॉक्टर इंजिनियर कलेक्टर वैमानिक शास्त्रज्ञ आणि पदापर्यंत मोठ्या संख्येने महिला झेप घेतील 
पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्हा परिषद प्रशाला ही अतिशय उत्कृष्ट शाळा असून येथील व्यवस्थापन ही अतिशय चांगले असल्यामुळे, या ठिकाणाहून गेलेली अनेक मुले मुली उच्च पदावर पोहोचलेली आहे, या शाळेच्या विकासामध्ये आपलेही योगदान असून शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन इथल्या समस्या सोडवण्याचे काम करीत असतो हे करीत असताना येथील जीर्ण झालेली शाळेची इमारत पाडण्याचा प्रस्ताव झाला होता मात्र या इमारतीचे पडलेले रॉ मटेरियल याची विल्हेवाट कुठे लावायची याचा खर्च कोणी करायचा या कारणावरून हे बांधकाम अद्याप पर्यंत पाडले गेले नाही यासंदर्भात आपण मंत्री असताना परतुर नगरपालिकेला या रॉ मटेरियलची विल्हेवाट लावण्याच्या सूचना आपण केल्या होत्या मात्र याबाबतीत तात्कालीन पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हे होऊ दिले नाही असेही यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले मात्र या शाळेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येथे शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
दरम्यान जालना येथे हुतात्माजनार्धन मामा वाद विवाद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, कु संस्कृती देवकर, कु प्रतीक्षा खंदारे, कार्तिक दिरंगे, कू अंजली सराटे या विद्यार्थ्यांचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
या कार्यक्रमाला भगवानराव मोरे दया काटे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,भाजपा शहराध्यक्ष गणेशराव पवार, नगरसेवक सुधाकर सातोनकर, संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे, शत्रुघ्न कणसे, शुभम आडे, गणेश राठोड, विस्ताराधिकारी नाना कदम गट समन्वयक कल्याण बागल अंजली कोळकर, श्री आठवे सर कैलास गाडगे, नाईक सर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची पालकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले