मोदी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी शेतमजुरांच्या हिताचा-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर




प्रतिनिधी कैलाश चव्हाण
  मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून हा अर्थसंकल्प शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय सर्वच वर्गातील लोकांना लाभदायक असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य करताना म्हटले आहे
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी केंद्र सरकार सरकारी केंद्राची उभारणी करणारा असून या केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे धान्य थेट केंद्र सरकार विकत घेणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले
शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सुविधा पुरवण्यासाठी पी पी पी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाणार असून या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले आहे
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की शेती पूरक उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्धविकास मत्स्य व्यवसाय पशुपालन व शेती यासाठी कृषी कर्जासाठी 20 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबरबागायती पिकांच्या रोगमुक्त आणि दर्जेदार लागवड साहित्य उपलब्धतेसाठी 2200 रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हंटले आहे
अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून 2024 पर्यंत या अन्नधान्याचा मोफत पुरवठा गोरगरिबांना केला जाणार आहे महिला सक्षमीकरणाचा उद्देश लक्षात घेऊन महिलांसाठी खास बचत योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी लोणीकर यांनी सांगितले
देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास केंद्र सरकार मदत करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी हा अर्थसंकल्प वरदायी असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून दळणवळण रेल्वे साठी मोठी तरतूद करण्यात आली असून 75 हजार कोटी रुपये रेल्वेसाठी या अर्थसंकल्पातून येत्या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहेत त्यामुळे भारतीय रेल्वेला खऱ्या अर्थाने सांगली दिवस येणार असल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे देशाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने गती प्रदान करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड