परतूर गवळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा नांदेड चे अध्यक्ष नंदकिशोर लुले यांचा सत्कार
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
गवळी समाज नांदेड चे अध्यक्ष नंदकिशोर लुले (आयकर अधिकारी नांदेड)यांनी नांदेड येथील वीरशैव गवळी समाजाचा दि. 10 रोजी सामूहिक विवाह सोहळा यशस्वी रित्या पार पडल्या बद्दल परतूर गवळी समाज बांधवांच्या सत्कार करण्यात आला. लग्न समारंभात होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मागील अठरा वर्षांपासून गवळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन होत असते
परतूर गवळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा नांदेड चे अध्यक्ष नंदकिशोर लुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परतूर गवळी समाजाचे अध्यक्ष रमाकांत बरीदे, चंद्रकांत बल्लमखाने, नंदकिशोर बल्लमखाने अदि दिसत आहेत
या मध्ये समाजातील अनेक डॉक्टर,वकील सह प्रसिद्ध व्यापारी यांचे पण लग्न पार पाडतात पण मागील करोना च्या दोन वर्षांच्या काळात हा विवाह सोहळा झाला नव्हता पण या वर्षी हा विवाह सोहळा नांदेड येथे आयोजित केला होता या वेळी समाजातील अठरा जोडप्याची लग्न झाली याच अनुषंगाने आज परतूर येथील समाज बांधव यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा समिती नांदेड चे अध्यक्षसुनील लुले यांचा सत्कार झाला यावेळी गवळी समाज परतूर चे अध्यक्ष रमाकांत बरीदे, चंद्रकांत बल्लमखाने,नंदकिशोर बल्लमखाने,श्री स्वामी,अर्जुन बल्लमखाने,ज्ञानेश्वर बरीदे आदी उपस्थित होते. फोटो ओळी-- नांदेड येथील गवळी समाजाचे अध्यक्ष सुनील लुले यांचा सत्कार करताना रमाकांत बरीदे चंद्रकांत बल्लमखाने दिसत आहे.