परतूर दिग्रस नवीन बससेवेमुळे प्रवाशासह भावीकांची सोय

तळणी प्रतिनिधी रवी पाटिल 
      परतूर आगाराने आज पासून परतूर दिग्रस अशी नविन फेरी सुरु केल्याने प्रवाशाची मोठी सोय झाली आहे विदर्भातील लोणार रिसोड वाशीम मगरूळ पीर ते पोहरा देवी पर्यन्त या बसचा प्रवास असणार आहे सर्वाचे आराध्य दैवत व बंजारा समाजाची काशी म्हणून परीचीत असलेल्या पोहरा देवीसाठी जाणाऱ्या भावीकांसाठी ही बसफेरी फायद्याची ठरणार आहे 
   आज पर्यन्त विदर्भातील काही शहरासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाश्याना ट्प्याखाली प्रवास करावा लागत असे व मंठा येथून दुपारी बारानंतर बराच वेळ बसचा फेरा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाश्याना विदर्भाकडे जान्यासाठी खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागायची नवीन वेळेत नविन बससेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले खास करून पोहरादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भावीकांची सख्यां या परीसरात मोठी असल्याने त्याच्या साठी सुध्दा ही बस सेवा फायद्याची ठरणार आहे ही बससेवा चालू करण्यासाठी प्रवाशी सघटना आमदार राजेश राठोड सरपंच गौतम सदावर्ते वंसत थोरवे उध्दवराव पवार सुभाष जायभाये अरुण राठोड आदीनी . प्रयत्न केले 
तर तळणी येथे बस आल्यानंतर ग्रामस्थाकडून वाहन चालकांचा सत्कार करन्यात आला यावेळी मोठ्या सख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत