परतूर येथे शिवजयंती उत्साहात , पूजन करून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करून मिरवणुकीस करण्यात आला प्रारंभ,आमदार लोणीकर यांनी मिरवणुकीत ढोल वाजवून केले शिवरायांना अभिवादन कार्यकर्त्यां मध्ये संचारला उत्साह,ढोल ताशे, आकर्षक देखावे, विविध क्रीडा प्रात्यक्षिके सादर मिरवणुकीतआली रंगत


परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा
आज परतुर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य अशी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली
रेल्वे गेट परिसरात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया माधवराव कदम, रामेश्वर अण्णा नळगे, कपिल अकात , नीतिन जेथलीया, विनायक काळे वीजय राखे रमेश सोळंके,महेश नळगे प्राध्यापक पांडुरंग नवल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिनिधी पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली
   मिरवणूकीची सांगता नारायण दादा चौक येथे महेश अकात ,उत्सव समती ,पत्रकार पोलीस बांधव यांच्या उपस्थीत करण्यात आली
मिरवणुकी दरम्यान आकर्षक ढोल पथक , कराटे चे विविध प्रात्यक्षिके लेझीम पथक आदी गोष्टी नागरिकांची लक्ष वेधून घेत होत्या शहरामध्ये सर्वत्र वातावरण दिसत होते 
या उत्सव मिरवणुकीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ढोल वाजवून शिवभक्तांना प्रोत्साहित केले 
अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आशा घोषणाबाजी सोडले होते
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीमध्ये परतूर शहरातील लहान पोर युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाली होते,
  दरम्यान शहरात मिरवणुकीचे स्वागत करताना व्यापारी महासंघाच्या वतीने शरबत, बाबासाहेब भाऊ अकात नागरी सहकारी पतसंस्था (सचीव कुणाल अकात) वतीने नाश्त्याची सोय योगी प्रदान यांच्यावतीने पाण्याची सोय तर नगरसेवक भाजपचे नगरसेवक यांच्या वतीने नाष्ट्याची व बिस्टिची सोय करण्यात आली होती
 उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून मिरवणूक काढल्याची भावना उपस्थित नागरिक व्यक्त करीत होते
या निवडणुकीमध्ये भगवानराव मोरे सुधाकर सातोनकर शत्रुध्न कणसे संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण, कृष्णा अरगडे, राजू भुजबळ, बाबुराव हिवाळे राजेंद्र मुंदडा, जगदीश झंवर   इज्जरान कुरेशी आखील काजी कदीर कुरेशि रहीमोद्दीन कुरेशि शोएब कुरेशी संतोष हिवाळे सुबोध चव्हाण,  ओम शेठ मोर सचिन खरात प्रमोद राठोड  राहूल सातोनकर  , राजेंद्र मस्के अनिल अग्रवाल राजेंद्र अग्रवाल विकास खरात सिद्धेश्वर लहाने गणेश ढवळे शिवा पवार  बाळासाहेब चव्हाण तीचे अध्यक्ष विष्णू मचाले , सचिव रशीद रशीद बागवान उपाध्यक्ष राहुल कदम ,कार्याध्यक्ष संदीप पचारे,,विकास बोडखे यांच्या सह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले