धागडधिंगा करण्यापेक्षा विचारांची शिवजयंती साजरी होणे आवश्यक - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर वीर शिवा काशिदांचे १३ वे वंशज श्री आनंदराव काशीद यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान,सर्व महापुरुषांनी शिवरायांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली आनंदराव काशीद यांचे प्रतिपादन,मंठा येथे मोरे पाटील परिवार व शिवसृष्टी आयोजित शिवजन्मोत्सव उत्सव कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर, पुरस्कार वितरण, स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
छत्रपती शिवाजी महाराज अखंड विश्वाची प्रेरणा असून धांगडधिंगा करण्यापेक्षा विचारांची शिवजयंती साजरी होणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिरावरचे कळस आणि अंगणातील तुळस आज आपल्याला पाहायला मिळते आहे मोरे पाटील परिवाराच्या वतीने मागील सोळा वर्षापासून शिवजन्मोत्सव कौटुंबिक स्वरूपात साजरा करण्यात चा पायंडा अत्यंत स्तुत्य असून हा पायंडा अखंडपणे जपावा शिवरायांच्या प्रेरणेने सर्व कार्य सिद्धीस जातात तेव्हा प्रत्येकाने शिवाजी महाराज डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले
मंठा येथे मोरे पाटील परिवार व शिवसृष्टी आयोजित शिवजन्मोत्सव 2023 निमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभ रक्तदान शिबिर व स्नेही भोजन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर वीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज श्री आनंदराव काशीद श्री अंकुशराव बोराडे श्री गणेशराव खवणे श्री संदीप गोरे श्री राजेश मोरे पंजाबराव बोराडे कैलासराव बोराडे श्री नागेश घारे विठ्ठलराव काळे राजेभाऊ खराबे प्रसादराव गडदे सुभाषराव बागल विकास पालवे गजानन उफाड माऊली ढाकणे परमेश्वर तर भागवत डोंगरे शरद सरकटे सिद्धेश्वर सरकटे शरद पाटील सचिन राठोड जानकीराम राठोड यांच्यासह मराठवाड्यातून आलेल्या आदर्श सरपंचांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वीर शिवा काशीद यांचे १६ वे वंशज श्री आनंदराव काशीद मोरे पाटील परिवार व शिवसृष्टी संस्थेच्या वतीने शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज अखंड विश्वाची प्रेरणा असून सर्वच राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक बोलणे आवश्यक आहे मती भ्रष्ट झाल्याप्रमाणे अनेक राजकीय नेते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व इतर महापुरुषांच्या बाबतीत हवे ते व वाटेल तसे बाष्कळ बडबड करत आहेत त्यांनी आपल्याला माहिती नसेल तर कुठेतरी थांबणे गरजेचे आहे आवश्यक नसेल किंवा माहिती नसेल तर त्या विषयावर न बोललेले बरे अशा शब्दात श्री लोणीकर यांनी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचे कान टोचले

शिवरायांची प्रेरणा सर्वच महापुरुषांनी डोळ्यासमोर ठेवली असून भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुभाष चंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेक महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी काम केले आहे तीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आज प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे वैचारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा त्याचप्रमाणे प्रत्येकाने गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपला वेळ व शक्य असल्यास धन खर्च करावे त्याशिवाय येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार मिळणार नाहीत चांगली संस्कार पिढी घडली नाही तर राष्ट्राचे भविष्य काय असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो अशा शब्दात शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती श्री आनंदराव काशीद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

मोरे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित या शिवजन्मशिव कार्यक्रम प्रसंगी ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोड गावामध्ये चांगलं काम करणाऱ्या गावाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या ३० सरपंच बांधवांना आदर्श सरपंच पुरस्काराने श्री लोणीकर व श्री आनंदराव काशीद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मोरे पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी शिवजयंती उत्सवासाठी लागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवून घेतली व त्या मूर्तीचे मूर्तिकार श्री भारत राठोड यांचा देखील यावेळी श्री बबनरावजी लोणीकर व श्री आनंदराव काशीद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

"जय जय महाराष्ट्र माझा" या गीताला राज्य सरकारने राज्य गीताचा दर्जा दिला असून १९ फेब्रुवारी २०२३ पासून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात हे गीत राष्ट्रगीताप्रमाणे सादर केले जाणार आहे त्याची सुरुवात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व श्री आनंदराव काशीद यांच्या उपस्थितीत मंठा येथे शिवसृष्टी संस्थेच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात करण्यात आली तुळजाभवानी कला मंच उस्मानपुर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत सादर केले

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री बाबासाहेब पाटील मोरे श्री किसनराव पाटील मोरे प्रा.सहदेव मोरे पाटील डॉ. कल्याण मोरे पाटील सतीशराव निर्वळ, अजय अवचार, विलास घोडके महादेव वायाळ बाळासाहेब तौर नारायण घाडगे लिंबाजी बागल योगेश देशमुख अमोल देशमुख विशाल वायाळ गोपाल चव्हाळ नामदेव चव्हाळ विनायक चव्हाळ दत्ताराव बारहाते विलास पवार दिनकर गोरे शरद मोरे संतोष बोराडे शंकर फड गजानन शिंदे मुंजाभाऊ गोरे राजेश वायाळ रमेश वायाळ वैभव वायाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले